अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगर भागात अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या भागात साथीचे आजार पसरु लागल्याने स्थानिक नागरिकांनी मनपा उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांना निवेदन देऊन ड्रेनेजलाईन तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली.
यावेळी आशा गायकवाड, हसीना शेख, समिना शेख, आयेशा बागवान, रेशमा बागवान, मनिषा शिंदे, हाजराबी शेख, शाहीन शेख, फरीदा शेख आदिंसह स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगर भागात अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात मोठी दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना घरात थांबणे देखील कठिण झाले असून,
पाऊस आल्यानंतर काही नागरिकांच्या घरात देखील हे मैलमिश्रीत पाणी शिरत आहे. वारंवार मनपा प्रशानाला कळवून देखील हा प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांच्या संतप्त भावना आहे. गाझीनगर भागात अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबली असून,
ड्रेनेजच्या घाण पाण्याचे डबके साचले आहे. या भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. तर अस्वच्छत दुर्गंधी व डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात कावीळ, टायफाईड, डेंग्यू सारख्या साथीचे आजार पसरण्यास सुरुवात झाली असून,
महापालिका व स्थानिक नगरसेवक देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दोन दिवसानंतर गाडीचे जेट दुरुस्त झाल्यानंतर तुंबलेल्या ड्रेनेजलाईनचे काम करुन देण्याचे आश्वसन उपायुक्त पठारे यांनी दिले.
येत्या सात दिवसात या भागातील ड्रेनेजलाईनचे काम न झाल्यास महापालिकेत आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved