या योजनेतील लाभार्थ्यांना एक किलो चणाडाळ मोफत मिळणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना जूलै 2020 ते सप्टेंबर 2020 या कालावधीकरिता प्रति महिना प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ वितरित केली जाणार आहे.

सद्य परिस्थितीत चणाडाळीचे नियतन प्रत्येक तालुक्यास प्राप्त होत आहे. त्यानुसार लाभार्थ्यांनी प्रति शिधापत्रिका एक किलो प्रमाणे माहे सप्टेंबर 2020 ची मोफत चणाडाळ आपले स्वस्त धान्य दुकानातुन घेवुन जावी,

असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी केले आहे. तसेच, जूलै 2020 व ऑगस्ट 2020 चे मोफत चणाडाळ वितरण करणेकरीता ई-पास मशिनवर मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

मागील दोन महिन्याची 2 किलो दाळ लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती माळी यांनी दिली. मोफत चणाडाळ वाटप करताना ई-पास द्वारे मिळालेली पावती ग्राहकांना देणे अनिवार्य आहे.

  • नियमांचे पालन करणे बंधनकारक
  • लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानामध्ये गर्दी करू नये
  • प्रत्येक ग्राहकांमध्ये 1 मीटर अंतर ठेवावे
  • प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक

आहे. राज्यात अख्या चण्याऐवजी डाळ घेण्यास अधिक पसंती असल्याचे निदर्शनास आले असून अनेक लोकप्रतिनिधीनी यासंदर्भात विनंती केली आहे. यास्तव हा निर्णय घेण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment