अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- एकीकडे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन व नागरिक यांची चाललेली कसरत आणि दुसरीकडे पसरत चाललेली गुन्हेगारी असे दुहेरी आवाहन सध्या समोर उभे आहे.
आता नुकतेच दरोड्याच्या तयारीतील पाच आरोपींना सोनई पोलिसांनी ताब्यात घेतले. मंगळवारी सापळा लावून त्यांनी अटक केली. अटक केलेल्या यता टोळीमध्ये दोघे नगर तालुक्यातील दहिगाव साकत येथील रहिवासी आहेत.
तर उर्वरित तिघे नेवासा तालुक्यातील लोहगाव येथील आहेत. सुनील फुलदास भोसले (वय 25), अजित विलास भोसले (वय 21) , महेंद्र योसेफ शिरसाठ (वय 40) (तिघे रा. लोहगाव ता. नेवासा) विजय गजानन काळे
(वय 23) व धर्मेंद्र (वय 35) (दोघेही रा.दहिगाव साकत ता. नगर) असे पकडलेल्या आरोपींचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की,
सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिंळाल्यावर दुपारी एकच्या सुमारास नेवासा तालुक्यातील वांजोळी येथे छापा टाकला.
आरोपींनी त्यांच्या कब्जातील पाच मोटारसायकली व शस्त्रे हे जागीच बेवारस टाकून घटनास्थळावरून पळ काढला. पथकाने पाठलाग करून वांजोळी येथील स्थानिकांची मदत घेऊन त्या शिवारात पळून गेलेल्या गुन्हेगारांपैकी पाच जणांना काही अंतरावरून शिताफीने ताब्यात घेतले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved