जर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला, तर या गोष्टी नक्की करा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. भारतात कोरोनाचे संक्रमण मोठ्या तीव्रतेने फोफावत आहे.

यामुळे जर अनावधानाने तुम्ही कधी कोणा पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात येऊन गेला अथवा कुटुंबीयांपैकी कोणाला कोरोनाचा संसर्ग झाला तर घाबरून जाऊ नका.

या कठीण परिस्थितीत तुम्ही काय केले पाहिजे याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास घरातच विलगिकरण व्हा आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या संपर्कात येऊ नका.

24×7 मास्क घाला आणि वापरानंतर योग्य विल्हेवाट लावा. विलगिकरणात असताना कुटुंबातील सदस्यांपासून 6 फूट अंतर राखा.

वेळोवेळी ताप मोजत रहा. जर तुमचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि तुम्हाला कोणतीही लक्षणे नसली तरी वरील नियमांचे पालन करा.

यासह तुम्हाला लक्षणे जाणवत असतील आणि अहवाल येण्यास काही काळ जाणार असेल तरीही वरील स्वतःला कोरोना रुग्ण समजून नियमांचे पालन करा.

तसेच लक्षणे नसतानाही अहवाल पॉझिटिव्ह आल्यास स्वतःला 10 दिवस घरात क्वारंटाईन करून घ्या आणि डॉक्टरांचे योग्य उपचार घ्या.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment