अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-रस्त्यांची दुरवस्था हा अहमदनगर जिल्ह्याला लागलेला शाप आहे. जिल्ह्यातील अनेक महामार्ग खराब झाले आहेत. नगर-मनमाड महामार्गाचीही अशीच दुरवस्था झाली आहे.
खड्ड्यांचा महामार्ग म्हणून या महामार्गाची आता ओळख झाली आहे. अनेक अपघातही या महामार्गावर झाले आहेत. या दुरवस्थेबद्दल शिर्डीतील युवकांनी नगराध्यक्षा अर्चना कोते यांच्यासमवेत
आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना आंदोलन करण्यासाठीचे निवेदन दिले. यावेळी ‘ मी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केल्याने त्यांनी 40 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे,
सदरील रस्त्याचे काम तातडीने सुरू होईल, तसे न झाल्यास तुम्ही पुकारलेल्या आंदोलनात स्वतः सहभागी होर्ईल,’ असे आश्वासन आ.विखे पाटील यांनी दिले.
दरम्यान, मागे काही दिवसांपूर्वी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.
यासंदर्भात आ. विखे पाटील यांनी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना या मार्गाच्या परिस्थितीचे फोटो आणि व्हीडीओची सीडी पत्रासोबत पाठवून या रस्त्याच्या दुरवस्थेकडे विभागाच्या अधिकार्यांनी केलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved