पारनेर :- तालुक्याच्या राजकीय क्षितिजावर सध्यस्थितीला घोंगवणारे वादळ म्हटले तर कोणीही डोळेझाकून नाव घेत ते म्हणजे लोकनेते निलेश लंके यांचे सामजिक कामाच्या माध्यमातून ज्यांनी संपूर्ण तालुक्यात आपली लोकनेता म्हणून ओळख निर्माण केली.
कोणतीही राजकिय सामजिक पार्श्वभूमी नसूनही,समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही सामजिक भावना मनात ठेवून लोकनेते निलेश लंके सारख्या अवलियाने पारनेर तालुक्यात जे सामजिक काम उभे केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात ते नक्कीच जाऊन बसले आहेत यात तिळ मात्र शंका नाही.
निलेश लंके यांनी आपल्या सर्वात मोठ्या युवक संघटनेच्या माध्यमातून पारनेर- नगर विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविले त्या मध्ये शेतकऱ्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर याठिकाणी भरवलेले सर्वात मोठे कृषी-प्रदर्शन,
नवरात्र उत्सवात पारनेर-नगर तालुक्यातुन सत्तर हजार महिलांना घडवलेली मोटादेवीचे देवदर्शन, तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूना प्रोत्साहन मिळण्यासाठी ग्रामीण स्तरावर विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन, बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन,
वाढदिवसा निमित्ताने आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन, महिला सक्षमीकरणासाठी महिला मेळाव्याचे आयोजन, स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी मार्गदर्शन शिबीर, असे सामजिक उपक्रम राबून निलेश लंके यांनी आपल्या पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.
सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या निलेश लंके यांचे वडील एक प्राथमिक शिक्षक त्यामुळे कुटूंबिक कोणतीही राजकिय सामजिक पार्श्वभूमी नसून ही आपल्या संघटमात्मक सामजिक कामाच्या जोरावर संघर्षांतून पारनेर मधील प्रस्थापित राजकारणात आपला एक वेळाच ठसा निर्माण केला आहे.
परंतू पारनेरच्या या पारंपरिक प्रस्थापित राजकीय सत्ता संघर्षामध्ये निलेश लंके सारखे सर्व सामान्य नेतृत्व भरडून निघत आहे. या दुष्काळी पारनेर तालुक्या समोर असलेले प्रलंबित प्रश्नांचा नेहमीच आपल्या स्वार्थी राजकारणा साठी येथील प्रस्थापित राजकिय घराण्यांनी योग्य असाच वापर केला.
या सर्वाना निलेश लंके अपवाद ठरले आहेत. निलेश लंके यांच्या राजकिय जीवनाची सुरुवात ही हिंदु हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन शिवसेना या पक्षातून झाली. ते शिवसेना पक्षाचे पारनेर तालुक्यात तेरा वर्ष तालुका प्रमुख होते.
त्या माध्यमातून ही त्यांनी आपले राजकीय सामजिक संघटन उभे केले त्यामुळे पारनेर चे शिवसेनेचे आमदार विजय औटी यांना सलग तीन वेळेस आमदार करण्यात निलेश लंके ची भूमिका महत्वपूर्ण अशीच राहिली आहे.
या माध्यमातून निलेश लंके यांनी तालुक्यात वाढलेले नेटवर्क आपल्याला पुढील राजकारणात आव्हान निर्माण करेल म्हणून या भीती-पोटी येथील कार्यसाम्राट लोकप्रतिनिधीने लंके सोबत कशा पद्धतीने कुरघोडीचे राजकारण केले हे सगळ्या तालुक्याने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.
वंशवादी भावनिक राजकारण करणाऱ्या शिवसेना पक्षातून कुरघोडीच्या राजकारणामुळे निलेश लंकेची हकालपट्टी करण्यात आली, त्यामुळे पारनेर तालुक्यातील पारंपरिक प्रस्थापित राजकिय पुढाऱ्यांना वाटलं निलेश लंके संपले.
पण लंके आपल्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित शरद पवार यांच्या कामाने प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पारनेर याठिकाणी जाहीर प्रवेश केला व आपल्या कामाच्या जोरावर लंके यांनी पारनेर- नगर विधानसभा मतदार संघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रस्थापित घराणेशाही विरोधात एक जबरदस्त आवाहन उभे केले आहे.
निलेश लंकेना विरोध करण्यासाठी तालुक्यातील एकमेकांचे पारंपरिक राजकीय विरोधक असलेले दोन्ही झावरे घराणी व अनेक पुढारी गुडघ्याला बाशिंग बांधून आपल्या भविष्यासाठी लंकेच्या विरोधात एकत्र मोट बांधत आहेत.
आमदार औटी यांचा लंके यांना असलेला प्रखर राजकीय विरोध तसेच तालुक्यातील शिंदे,ठुबे,वराळ,खिलारी, सालके,एरंडे,रोहकले,तांबे,दाते,भोसले,लामखडे, गायकवाड, शेळके, आशा अनेक पारंपरिक राजकीय सत्ताकेंद्राचा असलेल्या विरोधामुळे लंके यांना भविष्यातील विधानसभा निवडणुकीत विजय हा संघर्षमय आणि अडचणी आणणारा नक्कीच ठरू शकतो.
या प्रस्थापित राजकारणाला घराणेशाहीला पारनेर तालुक्यातील सुज्ञ जनता धडा शिकवेल काय..? की निलेश लंके यांच्या मागे सुरू असलेली आव्हानांची मालिका अशीच सुरू राहणार.
पारनेर तालुका पठारी तालुका त्यामुळे दुष्काळ हा तालुक्याच्या पाचवीलाच पुजलेला या तालुक्यात शेतकरी, कष्टकरी व धनगर,दलित,ठाकर,भिल्ल,रामोशी हा आदिवासी समाज मोठया प्रमाणात त्यामुळे उद्योगाच्या नोकरीच्या शोधात स्थलांतर ही मुंबई व पुणे सारख्या शहरीभागात मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पाहीजेल तसा तालुक्याचा विकास झालाच नाही.
याठिकाणी पिण्याच्या पाण्याचाच असलेला गंभीर प्रश्न असंख्य असलेल्या समस्या चे येथील पुढाऱ्यांनी निवडणुकांमध्ये भांडवलच केले आश्या तालुक्यात निलेश लंके सारख्या सामान्य नेतृत्वा समोर असलेले आवाहन आणि जनतेच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा
त्यात प्रस्थापित राजकारणाने विकासाचे मोडलेले कंबरडे यामुळे निलेश लंकेच्या रूपाने प्रस्थापित राजकारनाची घराणेशाही मोडीत काढून पारनेर ची जनता आता स्वतःच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी विधानसभा निवडणुकीत नवा राजकीय प्रयोग करणार का ?
- प्रवरेतील दूषित पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठवले पाथरे गावात प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांची भेट
- कोरठण खंडोबा गडावर उसळला जनसागर
- २ हजार ९०० चा पहिला हप्ता वर्ग ओंकार कारखान्यातर्फे प्रतिटन ३ हजार १० रुपयांचा बाजारभाव
- पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ! पतीसह सासू, सासरा आणि दिर या चौघांविरोधात गुन्हा दाखल…
- विमानाचं मायलेज नेमकं किती असत बरं ? वाचा ‘हि’ रंजक माहिती..