अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या होमगार्डचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. संदेश राजेंद्र विटनोर (वय २४, राहुरी) असे या मृताचे नाव आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी अकोले तालुका पोलिस ठाण्यात काही होमगार्ड नियुक्त केले आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था अगस्ती मंदिर परिसरात करण्यात आली आहे.
गुरुवारी सकाळी संदेश विटनोर हा इतर होमगार्ड मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेला होता. सध्या निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने संदेश बुडाला. अन्य होमगार्ड मित्रांनी अकोल्याचे पोलिस निरीक्षक अरविंद जोधळे यांना ताबडतोब या घटनेची माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक दीपक ढोमणे, कॉन्स्टेबल संदीप पांडे,
सचिन शिंदे हे घटनास्थळी गेले. संगमनेर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांनीही घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.
संपूर्ण दिवसभर शोध घेतल्यानंतर सायंकाळी ५ वाजता संदेशचा मृतदेह सापडला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved