मनोज कोतकर यांनी ‘ते’ पत्र जनतेसमोर मांडावे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  नगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांची वर्णी लावताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना भाजपमधून बाहेर आणत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले.

त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपला धक्का दिल्याची चर्चा असताना भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सभापती मनोज कोतकर हे भाजपचेच असल्याचा दावा करीत ज्यांना खेळी कळत नाही,

ते काहीही म्हणतात, अशी प्रतिक्रिया दिली आहे. महापौर वाकळे यांच्या या प्रतिक्रियेचे शिवसेनेत पडसाद उमटले असून नगरसेवक योगीराज गाडे यांनी

महापौरांच्या प्रतिक्रियेचा हवाला देत सभापती मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत सदस्य पत्र जनतेसमोर खुले करावे अशी मागणी केली आहे.

महापौरांचा दावा खरा मानायचा तर एकूणच या राजकारणात महाविकास आघाडीची पर्यायाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फसवणूक झाली आहे का? असा सवाल नगरसेवक गाडे यांनी विचारला आहे.अशा प्रकारची फसवणूक होत असेल तर ती सहन केली जाणार नाही,

असेही गाडे यांनी म्हटले आहे. महापौर वाकळे यांनी व्यक्त केलेले मत व त्यावर नगरसेवक गाडे यांनी उपस्थित केलेला सवाल पाहता नगरमध्ये राजकीय वादंग तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment