अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’रुग्ण, वाचा लेटेस्ट अपडेट्स

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर  जिल्ह्यात आज तब्बल ८५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ५३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.३३ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३७९६ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३०, नगर ग्रामीण ०८, नेवासा ०२, पारनेर ०३, संगमनेर ०४, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज ८५६ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला.

यामध्ये मनपा २३५, अकोले ४२, जामखेड ४७, कर्जत २१, कोपरगाव ४३, नगर ग्रामीण ३९, नेवासा ३९, पारनेर ४४, पाथर्डी ३५,

राहाता ५४, राहुरी ५४, संगमनेर ७४, शेवगाव २९, श्रीगोंदा २४, श्रीरामपूर ४२, कॅंटोन्मेंट ११, मिलिटरी हॉस्पिटल २१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:३७५३१*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:३७९६*

*मृत्यू:६८५* *एकूण रूग्ण संख्या:४२०१२*

*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment