अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असल्याने नद्या, नाल्या, तलाव हे पूर्ण क्षमतेने भरली गेली आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न एकदाचा मिटला आहे.
दरम्यान; कर्जत तालुक्यातील तोरकडवाडी येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या व पूर्ण क्षमतेने भरलेल्या साठवण बंधाऱ्यातील जलपूजन खासदार डॉ. विखे पाटील यांचे हस्ते झाले.
यावेळी बोलताना खासदार विखे म्हणाले कि, यावर्षी कर्जत तालुक्यातील सर्व भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे साठवण बंधारे व जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे.
ही अत्यंत समाधानाची बाब आहे. तालुक्यातील साठवण बंधारे व जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून साठलेले पाणी शेतकऱ्यांना वरदान ठरले आहे.
यामुळे निश्चितच जलक्रांती होऊन हरितक्रांती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार डॉ. विखे पाटील यांनी तालुक्यातील जलालपुर, राक्षसवाडी,
तोरकडवाडी, राशिन, कर्जत शहर, चांदे, घुमरी या गावांचा दौरा केला. तेथे त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधित अडचणी समजून घेतल्या. तसेच काही अडचणींचे संबंधितांशी संपर्क करीत सोडविल्या.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved