अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- साधं विजेचे कनेक्शन कट झाले व ते दुरुस्तीसाठी महावितरणकडे गेलो तर त्या कामासाठी ४ दिवस लावणार अशी ओळख असलेली महावितरणाबाबत एक नवलच घडले आहे.
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर गावातील रोहित्र जोरदार पावसामुळे जळाले होते. मात्र त्याठिकाणी नवीन रोहित्र बसविण्यात न आल्याने ग्रामस्थांना मोठी अडचण निर्माण झाली होती.
या गावातील ग्रामस्थ संजय नागरे यांनी हे रोहित्र बसविण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना विनंती केली.
ऊर्जामंत्र्यांनी तातडीने याची दखल घेऊन हे रोहित्र तात्काळ बसविण्याचे संबंधितांना आदेश दिले. आदेशानंतर 24 तासाच्या आत बुधवारी आज दुपारी हे रोहित्र बदलण्यात आले
आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. ग्रामस्थांनी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आभार मानून राज्याला तत्पर ऊर्जा मंत्री मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved