चोविस तासांत सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यु

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात २४ तासांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत ४०५ ने वाढ झाली. सध्या ४ हजार १४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३९ हजार ५६२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

दरम्यान आज सहा जणांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ७२४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज ०५,

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २०७ आणि अँटीजेन चाचणीत १९३ रुग्ण बाधित आढळले. खाजगी प्रयोगशाळेनुसार अहमदनगर शहर ७१, अकोले ०३, जामखेड ०२, कोपरगाव ०४, नगर तालुका १३,

नेवासा ०६, पारनेर ११, पाथर्डी ०३, राहाता २३, राहुरी ३२, संगमनेर १७, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीनुसार कोपरगाव २४, नगर तालुका १६, राहाता ३६, राहुरी १९, संगमनेर ३२, श्रीगोंदा २१, भिंगार शहर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज ७२४ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला.

यामध्ये अहमदनगर शहर १६०, अकोले ३७, जामखेड ४२, कर्जत १९, कोपरगाव २४, नगर तालुका ४२, नेवासा ३६, पारनेर २९, पाथर्डी ३०, राहाता ६८, राहुरी ४३,

संगमनेर ५१, शेवगाव ४३, श्रीगोंदा ३९, श्रीरामपूर ५५, भिंगार शहर ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०३,इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment