अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज अखेर आपला पदभार स्वीकारला आहे. दरम्यान जिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढता आलेख, अवैध धंदे, यांना नक्कीच आळा बसेल अशी अपेक्षा नगरकरांनी बाळगली आहे.
दरम्यान पोलीस अधीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर म्हणाले की, वाळू तस्करी च्या माध्यमातून संघटित गुन्हेगारी वाढत आहे. नगर जिल्ह्यात याचे प्रमाण गंभीर आहे त्यामुळे ही संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी वाळू तस्करी वरील कारवाई माझी प्रायोरीटी राहील.
रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे मागील पाच वर्षाचे गुन्ह्यांची माहिती घेऊन त्यांचा अभिलेख तयार करणार आहे, असे प्रतिपादन नगर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शुक्रवारी केले. चोरी, घरफोडी, दरोडे अपघात व अन्य प्रकारची गुन्हेगारी राज्यात सगळीकडे आहे,
तशी ती नगरला ही आहे. मात्र येथे वाळू तस्करी तुन संघटीत गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे ते रोखण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षक पदाच्या माध्यमातून करणार आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे मागील पाच वर्षाचे गुन्ह्यांची माहिती घेऊन त्यांचा अभिलेख तयार करणार आहे त्यानुसार त्यांच्यावरील प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात करणार आहे,
सध्या सर्वत्र सायबर गुन्हेगारी चा प्रमाण वाढले आहे या संदर्भातील अज्ञाना मुळे गैरफायदा घेऊन फसवणुकीचे प्रकार होत आहेत त्यामुळे अशा प्रकारांतील गुन्हेगारांचा शोध घेण्याबरोबरच सायबर क्राईम रोखण्यासाठी नागरिकांमध्येही अवेरनेस निर्माण करण्याचा विशेष प्रयत्न करणार आहे असे पाटील यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved