अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-नगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप मुरंबीकर यांची औरंगाबादमध्ये आरोग्य सहाय्यक संचालक पदी बदली झाली आहे.
त्यांच्या जागी नगरमध्येच कार्यरत असलेले अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल पोकर्णा यांची जिल्हा शल्य चिकित्सक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.वर्षा डोईफोडे यांची औंध (पुणे) येथे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक पदावर बदली झाली आहे.
गोंदिया येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भूषणदास रामटेके यांची नगर जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार जर्हाड यांची संगमनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदी बदली झाली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved