महसूलमंत्री थोरातांच्या घरासमोर बहीण दुर्गा तांबे आणि मेहुणे आ. तांबे बसले उपोषणाला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  मराठा आरक्षणाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. परंतु या सर्व घडामोडींमुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे.

त्यामुळे विविध ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आंदोलने सुरु आहेत. संगमनेर येथेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील निवासस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने

आंदोलनाला सुरूवात झाली आहे. या आंदोलनामध्ये महसूल मंत्री थोरात यांच्या भगिनी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, त्यांचे पती आमदार डॉ. सुधीर तांबे हे देखील सहभागी झाल्याने सर्वांचा हा चर्चेचा विषय झाला आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या शनिवारी (२६ सप्टेंबर) नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत २ आॅक्टोबर ला खासदार, आमदार यांच्या घरासमोर निर्देशने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या विषयावर सरकारची सविस्तर भूमिका मांडत मराठा समाजाला संयम राखण्याचं आवाहन केलं.

आरक्षण मिळण्याआधी समाजाला दिलासा देण्यासाठी काय करता येईल यावर विचार सुरू आहे. त्यामुळं कृपया मोर्चे व आंदोलने करू नका. कोरोनाचं संकट असताना अशा आंदोलनाची खरंच गरज नाही,’ असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं होत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment