अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. मात्र या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे.
दरम्यान या खड्यांचे लोकप्रतिनिधींनी देखील चांगलेच राजकरण केले होते. रस्त्यावरील खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहनचालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
या रस्त्याने वाहनेच काय; पायी चालणेही कठीण झाले आहे. शेवगाव शहर व तालुक्यातून पाथर्डी, कोरडगाव, तिसगाव, पांढरीपूल, नेवासे, पैठण व गेवराईकडे प्रमुख राज्यमार्ग, तसेच पैठण-पंढरपूर पालखी मार्ग जातो.
या सर्व रस्त्यांची जूनपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर्ण वाताहत झाली आहे. रस्त्यांवर जागोजागी मोठमोठे खड्डे पडून खडी रस्त्यावर पसरली आहे. पावसाचे पाणी साचून चिखल होत असल्याने,
वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात घडत आहेत. छोटे वाहन खड्ड्यातच अडकून पडते. पाठीमागून व समोरून येणाऱ्या वाहनांना त्याचा अंदाज येत नाही.
त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नेवासे, नगर, पांढरीपूल, गेवराई, पैठण, आखेगाव या रस्त्यांची तर खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली असून, संपूर्ण रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved