राज्य सरकारला नमवून आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- धनगर सारा एक’ असा नारा देत आज कोल्हापूरात धनगर समाजाची गोलमेज परिषद पार पडली. राज्य सरकारला नमवून आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. आजपर्यंत अनेक राज्यकर्त्यांनी ७० वर्षे धनगर समाजाचा उपयोग करून घेतला.

मात्र आता हे होऊ देणार नाही. असं मत माजी आमदार राम शिंदे यांनी परिषदेनंतर आलेल्या पत्रकार बैठकीत जाहीर केले. पुन्हा एकदा राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.

त्यावेळी आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी दिला.धनगर समाज सत्तावीस वर्षे झगडत आहे. आजदेखील धनगर -धनगड मुळे आजदेखील समाज पिचत आहे.

राज्यकर्त्यांची केवळ आश्वासन मिळाली. पण राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला वाऱ्यावर सोडलंय. अशी टीका माजी आमदार राम शिंदे यांनी केली. आता केवळ आरक्षण दिले पाहिजे.

तुमची चर्चा, आश्वासन नकोत. तुमची धोतांड चर्चा बंद करा. आरक्षणासाठी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा माजी आमदार शिंदे यांनी दिला.

मराठा आरक्षणाची गोलमेज परिषद कोल्हापूरात झाल्यानंतर आज अक्षता मंगल कार्यालय येथे धनगर आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी गोलमेज परिषद पार पडली.

या परिषदेला राज्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, राम शिंदे, कल्पना गावडे, बबनराव राणगे, आयोजक संदीप कारंडे, विष्णु माने, सुरेश कांबळे, नागेश पुजारी, संतोष शिंदे, अनिल कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment