अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- शिवसेना संपर्कप्रमुख बदला अशी मागणी केली म्हणून आता चोराच्या उलट्या बोंबा काय सुरू झाल्या असून शहरप्रमुख बदला अशी मागणी केली जात आहे.
सेनेचे मनपाचे गटनेते संजय शेंडगे व नगरसेवक गणेश कवडे यांनी माझ्यावर टीका केली साफ चुकीचे आहे. ज्यावेळेस स्वर्गीय अनिल राठोड यांच्या आमदारकीच्या वेळेस माझ्या सावेडी उपनगरातून शिवसेनेला जास्त मते पडली आहेत. माझ्यावर आरोप करणारांनी स्वतःच्या प्रभागातून किती मते मिळाली त्याचा विचार करावा.
ज्या संपर्कप्रमुखांचा त्यांना कळवळा आला आहे. हेच संपर्कप्रमुख व त्यांचा जावई यांना स्वतःच्या फायद्यासाठी याच शिवालयात धक्काबुक्की केली.व गाडी फोडली होती, हे विसरू नका, असा पलटवार शिवसेनेचे काका शेळके यांनी केला आहे.
शेळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपर्कप्रमुख स्व.अनिल भैय्या यांचे इलेक्शन झाल्यापासून कितीवेळा शिवालयात मीटिंगसाठी आले? त्यांच्या सगळे मिटींगा दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयात होत असतात. शिवसेनेची स्थापना झाली तेव्हापासून शिवसेनेचे काम चितळे रोड येथील राठोड यांच्या शिवालय येथून चालायचे.
मग आता नगर शहरामध्ये दोन-दोन संपर्क कार्यालय कशासाठी ? याचे कारण संपर्कप्रमुख यांनी द्यावे व त्यांची बाजू घेणाऱ्यांनी सांगावे . यांच्या अंतर्गत वादामुळे राठोड यांना दोन वेळेस पराभव पत्करावा लागला.
राठोड यांनी ह्याचे सर्व पुरावे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना दिलेले आहेत. मी सकाळी बुर्हाणनगर, दुपारी सारसनगर आणि संध्याकाळी चितळे रोड हे कधीच केलं नाही, असे ही शेळके यांनी म्हटले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved