अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- नगर अर्बन बँकेच्या केडगाव व मार्केट यार्ड शाखांमधील कर्ज प्रकरणात २२ कोटी ९० लाख रकमेचा अपहार झाला आहे.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सात जणांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झाल्यामध्ये डॉ. निलेश विश्वासराव शेळके,
डॉ. विनोद आण्णासाहेब श्रीखंडे, डॉ. रवींद्र दौलतराव कवडे, डॉ. भास्कर रखमाजी सिनारे, गिरीश ओम प्रकाश आग्रवाल, निर्मल एजन्सी,
अहमदनगर आणि स्पंदन मेडिकेयर,पुणे यांचा समावेश आहे. बॅकेचे व्यवस्थापक महादेव पंढरीनाथ साळवे (रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. हॉस्पिटलमधील मशिनरी खरेदी करण्यासाठी
आरोपी यांनी बँकेच्या केडगाव व मार्केट यार्ड शाखेत कर्जप्रकरण दाखल केले होते. यासाठी आरोपी हे एकमेकांचे जामीनदार राहिले. तसेच डॉ. कवडे यांना गिरीश आग्रवाल हे जामीनदार राहिले.
कर्जाच्या रकमेतून हॉस्पिटलसाठी कोणत्याही प्रकारची मशिनरी खरेदी न करता निर्मल एजन्सी व स्पंदन मेडिकेयर यांच्याबरोबर संगनमत करून
त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले. यानंतर रोहिणी सिनारे आणि उज्वला कवडे यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर कर्जाची रक्कम ट्रान्सफर करून कर्ज रक्कमेत गैरव्यवहार केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved