शरीराच्या संबंधित ज्या काही सामान्यपणे तक्रारी असतात त्यामध्ये किडनी स्टोन म्हणजे मूतखडा ही एक सामान्य समस्या म्हणून ओळखली जाते. जेव्हा शरीरामध्ये जास्तीचे क्षार असतात व ते लघवीच्या माध्यमातून शरीरातून बाहेर काढून टाकता येत नाही आणि मूत्रपिंडात ते जमा व्हायला लागतात तेव्हा त्या ठिकाणी स्टोन तयार होतो त्यालाच आपण मुतखडा किंवा किडनी स्टोन म्हणतो.
यामध्ये प्रामुख्याने खाण्यापिण्यातील अनियमितता आणि पुरेसे पाणी न पिणे हे मुतखडा होण्यामागे प्रमुख कारण समजले जाते.जेव्हा किडनी स्टोन तयार व्हायला लागतो तेव्हा मूत्राशयामध्ये अडथळा निर्माण होतो व लघवी करण्याला त्रास होतो. किडनी स्टोनच्या त्रासामध्ये लघवी करताना जळजळ तसेच आग होते व प्रचंड प्रमाणात रुग्णाला वेदना होता.
यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यक्तीला त्रास होऊ शकतो. किडनी स्टोन होण्यामध्ये आपल्या आहारातील काही गोष्टी देखील कारणीभूत ठरतात. त्यामुळे जर किडनी स्टोन पासून दूर राहायचे असेल तर काही पदार्थ खाणे टाळायला हवे. त्यामुळे या लेखात आपण कोणत्या गोष्टी खाऊ नयेत याबाबत वैद्यकीय तज्ञांनी दिलेली माहिती पाहू.
किडनी स्टोन पासून दूर राहायचे असेल तर चुकून खाऊ नका हे पदार्थ
1- प्रोटीन युक्त पदार्थ टाळावे– समजा तुम्हाला जर किडनी स्टोनचा त्रास असेल तर ज्या अन्नपदार्थांमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात आहे असे पदार्थ खाणे टाळावे. यामध्ये प्रामुख्याने चिकन, मासे, अंडी, दही, दूध तसेच चणे आणि डाळी इत्यादी पासून बनवलेले पदार्थांचा आहारामध्ये समावेश करू नये. कारण या पदार्थांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे मूत्रपिंडावर वाईट परिणाम होतो.
2- फॉस्फरसचे प्रमाण असलेले पदार्थ– जंक फूड्स, फास्ट फूड तसेच चिप्स, कॅन सूप, चॉकलेट तसेच नट, लोणी, कार्बोनेटेड पेये, लोणी, सोया तसेच शेंगदाणे, काजू, मनुका यासारख्या पदार्थांमध्ये अधिक प्रमाणात फॉस्फरस असते व त्यामुळे हे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे.
3- कोल्ड्रिंक्स– किडनी स्टोन झाला असेल तर सॉफ्ट आणि कोल्ड्रिंकचे सेवन अजिबात करू नये. कारण कोल्ड्रिंक्स तयार करण्याकरिता फॉस्फोरिक ऍसिडचा वापर केला जातो. त्यामुळे मुतखडा असताना या कोल्ड्रिंकचे सेवन करणे त्रासाचे ठरू शकते व स्टोनचा धोका आणखी वाढण्याची शक्यता असते.
4- जास्त मीठ खाऊ नये– बीट तसेच जांभूळ, पालक, सुकामेवा आणि चहा याच्यामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते व त्याचे अति सेवन न करणे हिताचे ठरते. त्यासोबत जास्त मिठाचे सेवन करू नये कारण मिठामध्ये असलेले सोडियम शरीरामध्ये गेल्यावर त्याचे कॅल्शियम मध्ये रूपांतर होते व त्याचे खडे व्हायला सुरुवात होते व त्यामुळे जीवनात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे.
मुतखड्याचा अर्थात किडनी स्टोनचा त्रास होऊ नये म्हणून काय करावे?
मुतखड्याचा अर्थात किडनी स्टोनचा त्रास होऊ नये म्हणून भरपूर प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच फळे, भाज्या तसेच धान्य आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांवर लक्ष केंद्रित करावे व त्या पद्धतीचा संतुलित आहार घ्यावा. अशा पद्धतीने जरा आहार घेतला तर किडनी स्टोनचा धोका कमी व्हायला मदत होते. वैयक्तिक आहारामध्ये बदल करण्याअगोदर किंवा आहारासंबंधी बदल करण्या अगोदर आहार तज्ञांचा किंवा वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा.