केंद्र सरकारच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टींसाठी ई-केवायसी आता बंधनकारक करण्यात आलेली आहे व ही ई केवायसी आता एलपीजी सिलेंडर ग्राहकांना देखील महत्त्वाची व बंधनकारक करण्यात आलेली आहे. यामागे सरकारचा उद्देश आहे की ई केवायसीच्या माध्यमातून यासंबंधीचे बनावट खाते आणि व्यावसायिक सिलेंडरचे फसवे बुकिंग बंद होईल व त्याकरिता ई केवायसी महत्त्वाची आहे.
परंतु आता या ई केवायसी बद्दल कोट्यावधी एलपीजी सिलेंडर ग्राहकांना दिलासा मिळाला असून याबाबत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
एलपीजी सिलेंडर ग्राहकांना मोठा दिलासा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी कोट्यावधी एलपीजी सिलेंडर ग्राहकांना दिलासा दिला असून एलपीजी सिलेंडर साठी आवश्यक असलेली इ केवायसी करण्यासाठी आता कोणतेही कालमर्यादा नसणार आहे व त्या पद्धतीची माहिती त्यांनी दिली. कंपन्यांच्या माध्यमातून एलपीजी ग्राहकांसाठी ई केवायसी लागू करण्यात येत आहे.
या माध्यमातून बनावट खाती आणि व्यावसायिक सिलेंडरचे फसवी बुकिंग बंद होईल असे देखील पुरी यांनी म्हटले. याबाबत केरळ विधानसभेतील विरोधी पक्ष नेते व्हि.डी. सतीशन यांच्या पत्राला उत्तर देताना पुरी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स वर या संदर्भातली माहिती दिली आहे. त्यामुळे आता एलपीजी सिलेंडर ग्राहकांची इ केवायसी साठी होणारी धावपळ थांबणार आहे.
अशा पद्धतीने केली जाते ई केवायसी ची प्रक्रिया
एलपीजी डिलिव्हरी कर्मचारी ग्राहकांना एलपीजी सिलेंडर जेव्हा पोहोचवतात तेव्हा ग्राहकाच्या ओळखपत्रांची पडताळणी करतात. डिलिव्हरी कर्मचारी त्यांच्या मोबाईल फोनवरील ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ग्राहकाचे आधार कार्ड कॅप्चर करतात
व त्यानंतर गॅस सिलेंडर ग्राहकाला एक ओटीपी मिळतो व ओटीपीचा वापर संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वापरला जातो. तसेच ग्राहक आपल्या सोयीनुसार गॅस वितरकांशी याबाबतीत संपर्क साधू शकतात असं देखील पुरी यांनी म्हटले.
स्वतःला देखील करता येते ई केवायसी
एलपीजी ग्राहक एचपीसीएल, आयओसी सारख्या कंपन्यांचे ॲप इन्स्टॉल करून त्या माध्यमातून देखील ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता. याबाबत ग्राहकांना आश्वस्त करता यावे व त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा गैरसोय होऊ नये म्हणून इंधन कंपन्यांच्या माध्यमातून या संदर्भात प्रसिद्धी पत्रक देखील जारी करण्यात येत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.