अप्पर पोलीस अधिक्षक राठोड यांचा सत्कार

Published on -

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने अप्पर पोलीस अधिक्षक दत्ताराम राठोड यांनी पदभार स्विकारला असता तसेच त्यांना गोंडवाना विद्यापिठाची पीएचडी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष जालिंदर बोरुडे, संजय भिंगारदिवे, अतुल थोरात, अनिल जाधव, सर्जेराव त्रिभूवन आदिंसह जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष जालिंदर बोरुडे म्हणाले की, पाथर्डी तालुक्यातील शिरापूरचे भूमिपुत्र असलेले दत्ताराम राठोड यांची पोलीस खात्यातील सेवा उत्कृष्ट आहे.

कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून, त्यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार आहे.

बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ सर्वांना बरोबर घेऊन लोककल्याणासाठी कार्यरत आहे. तसेच फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून चालू असलेल्या सामाजिक कार्याची त्यांनी माहिती दिली.

दत्ताराम राठोड म्हणाले की, शासकीय अधिकारी व कर्मचारी समाजातील विकासाचा दुवा आहे. सामाजिक बांधिलकी ठेऊन सर्वांनी कार्य केल्यास बदल घडणार आहे. जनतेशी नाळ जोडून केलेल्या कार्याने एक वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!