विरोधी संचालकांचा माध्यमिक शिक्षक सोसायटीत ठिय्या

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- सभासद हिताच्या विविध न्याय मागण्यांसाठी परिवर्तन मंडळाच्या वतीने विरोधी संचालकांनी माध्यमिक शिक्षक सोसायटीत ठिय्या आंदोलन केले.

या आंदोलनात संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर सहभागी झाले होते. आंदोलकांनी तोंडाला काळे फडके बांधून सत्ताधारींच्या हुकुमशाही कारभार पध्दतीचा निषेध नोंदवला.

सन 2019-20 चा लाभांश सभासदांच्या खात्यावर व्याजासहित त्वरित वर्ग करावा, सेवानिवृत्त नाममात्र ब वर्ग सभासदांना अ वर्ग मूळ सभासदत्व देऊन संस्था पैसेवाले धनदांडग्यांच्या ताब्यात देण्याचा उपविधी त्वरित मागे घेण्यात यावा,

मयत निधीची अवाजवी वाढ त्वरित कमी करावी, कायम ठेवीवरील व्याजदर वाढवावा, जामीन कर्ज मर्यादा 15 लाख रुपये करण्याची मागणी परिवर्तन मंडळाच्या विरोधी संचालकांनी केली आहे. तातडीने सदर प्रश्‍न मार्गी लावण्याचे निवेदनात म्हंटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved