Goat Rearing Business:- सध्या शेतीशी निगडित असलेल्या जोडधंदयामध्ये तरुणांच्या माध्यमातून सगळ्यात मोठी पसंती दिली जात आहे ती शेळीपालन व्यवसायाला. कारण शेळीपालन व्यवसाय हा कमीत कमी जागेत, कमीत कमी खर्चात करता येणारा व्यवसाय आहे आणि त्यामानाने दिवसातून मिळणारे आर्थिक उत्पन्न मात्र खूप जास्त असते.
तसेच पशुपालन व्यवसायांसारखे जास्त प्रमाणात व्यवस्थापन करण्याची देखील आवश्यकता नसते. परंतु आता शेळीपालन व्यवसायामध्ये देखील अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो व अत्याधुनिक अशा गोठ्यांची उभारणी करून त्यामध्ये शेळीपालन व्यवसाय केला जातो.
कुठलाही व्यवसाय करताना ज्याप्रमाणे अचूक व्यवस्थापनाला महत्त्व असते. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही पालनासाठी कोणत्या जातीची शेळी निवड करत आहात याला देखील तितकेच महत्त्व असते.
कारण शेळीची जात जितकी जातिवंत असेल तितके त्यापासून मिळणारे उत्पन्न जास्त असते. त्यामुळे या अनुषंगाने आपण या लेखात अशा काही शेळ्यांच्या विदेशी जाती बघणार आहोत ज्या दूध उत्पादनात तर सरस आहेतच. परंतु मांस उत्पादनात देखील सरस आहेत.
या विदेशी जातीच्या शेळ्या शेळीपालनात देतील लाखोत पैसा
*सानेन शेळी*
1- ही शेळी प्रामुख्याने स्वित्झर्लंड मधील सानेन या ठिकाणीची आहे.
2- या विदेशी जातीच्या शेळ्या जगभरातील 80 पेक्षा जास्त देशांमध्ये पाळल्या जातात.
3- सानेन जातीच्या शेळ्यांचे वजन कमीत कमी 85 किलोपर्यंत असते.
4- या जातीच्या शेळीचा रंग पाहिला तर या शेळ्या प्रामुख्याने सफेद रंगाचे असतात.
5- सानेन जातीच्या शेळ्यांना मुख्यत्वे शिंग नसतात.
6- सानेन जातीच्या शेळीचे कान मात्र सरळ असतात.
7- मांस उत्पादनामध्ये ही शेळी सरस आहे.
*टोगेनबर्ग शेळी*
1- ही शेळी स्वित्झर्लंड मधील टोगेनबर्ग येथे आढळून येते.
2- या शेळीला देखील शिंगे नसतात.
3- टोगेनबर्ग जातीची शेळी चार ते साडेचार लिटर पर्यंत दूध देते.
4- या शेळ्यांचे कान ताठ राहतात व मान लांब तसेच पातळ असते.
5- या जातीच्या शेळ्यांच्या अंगावरील केस तपकिरी आणि पांढरे असतात.
6- टोगेनबर्ग जातीची शेळी प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी पाळली जाते.
* अँग्लो–न्यूबियन शेळी*
1- या जातीच्या शेळ्या युरोपातील अनेक देशांमध्ये आढळून येतात.
2- अँग्लो न्यूबियन शेळीचे पालन प्रामुख्याने मांस आणि दूध या दोन्हींसाठी केले जाते.
3- ही शेळी दररोज तीन ते साडेतीन लिटर पर्यंत दूध देण्यास सक्षम आहे.
4- या शेळीची शारीरिक रचना पाहिली तर तिचे पाय लांब असतात आणि कान लांब आणि लटकलेले असतात.
5- या जातीच्या शेळ्यांचे शिंगे लहान असतात व ते खालच्या दिशेने वळलेली असतात.
*अल्पाइन शेळी*
1- या शेळ्या स्वित्झर्लंडमधील अल्पाईन या ठिकाणी आढळून येतात.
2- अल्पाइन शेळी ही प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी पाळली जाते.
3- या जातीच्या शेळ्या दररोज तीन ते चार लिटर पर्यंत दूध देतात.
4- अल्पाइन जातीच्या शेळीचे वजन 61 किलो असते.
5- तसेच या शेळ्या पांढऱ्या किंवा तपकिरी तसेच काळ्या रंगाच्या असतात.
6- या जातीच्या शेळ्यांची दूध देण्याची क्षमता जास्त असते.