भारतीय बाईक मार्केट होणार गार! रॉयल एनफिल्डची ‘ही’ बाईक या तारखेला नव्या रूपात येणार ग्राहकांच्या भेटीला,वाचा काय राहतील फीचर्स?

Published on -

रॉयल एनफिल्ड आणि यांचा खूप जवळचा संबंध असून रॉयल एनफिल्डच्या बाईक्स वापरण्याची क्रेझ तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये रॉयल एनफिल्डच्या बाईक वापरणाऱ्यांचा एक मोठा वर्ग असून या कंपनीच्या बाईकचा लूक व त्यामध्ये असलेली वेगवेगळे फीचर्स यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड प्रमाणात या बाईक्सना पसंती दिली जाते.

रॉयल एनफिल्डच्या माध्यमातून अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि उत्तम अशा लूक असलेल्या बाईक आजपर्यंत बाजारपेठेत आणल्या गेल्या व त्यांना ग्राहकांकडून देखील तितकाच उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आपण पाहतो. त्यातील जर रॉयल एनफिल्डची आपण क्लासिक 350 ही बाईक पाहिली तर हिला देखील ग्राहकांकडून आणि विशेषतः तरुणांकडून खूप मोठा प्रतिसाद मिळालेला होता व सर्वात जास्त विक्री होणारी दुचाकी ठरली होती.

याच रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 चे आता अपडेटेड व्हर्जन रॉयल एनफिल्ड लॉन्च करणार असून साधारणपणे 12 ऑगस्टला ही बाईक ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे जुन्या क्लासिक 350 बाईक मध्ये जे वैशिष्ट्य आहेत ते या नवीन दुचाकी मध्ये सुद्धा असणार आहेत. तसेच अनेक बदल देखील यामध्ये करण्यात आलेले आहेत.

 रॉयल एनफिल्ड 12 ऑगस्टला लॉन्च करणार क्लासिक 350 चे अपडेटेड व्हर्जन

रॉयल एनफिल्ड तिचे क्लासिक 350 चे अपडेटेड व्हर्जन 12 ऑगस्टला लॉन्च करणार असून या अपडेटेड बाईकमध्ये रॉयल एनफिल्ड 350 मध्ये नवीन एलईडी हेड लॅम्प, एलईडी टेल लॅम्प आणि एलईडी पायलट लॅम्प देण्यात येणार असल्यामुळे ही बाईक अनेक दृष्टिकोनातून आकर्षक दिसणार आहे.

या बाईकमध्ये रियर ड्रम ब्रेक असणार असून त्यामुळे ही बाईक अधिक वैशिष्ट्यपूर्ण अशी असणार आहे. बाईकचे इंजिन एका मजबूत अशा डुएल क्रेडल फ्रेममध्ये ठेवलेले असून ज्याला पुढील बाजूस 41 मिमी टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागच्या बाजूला फ्री लोड अड्जस्टेबल ट्विन शॉक अबसॉर्बरने धरून ठेवले आहे व त्यामुळे ते आरामदायी प्रवासासाठी फायद्याचे ठरणार आहे.

तसेच या बाईकमध्ये 349 सीसीचा दमदार एअर ऑइल कुल्ड सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 20.2 बीएचपीचा पावर द्यायला सक्षम असून 27nm चा पिक टॉर्क देखील देईल. तसेच ही मजबूत मोटार एका स्मूथ शिफ्टिंग पाच स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे व जी चांगला वेग देण्यासाठी महत्त्वाची ठरते.

या बाईकची ब्रेकिंग पाहिली तर ती दोन्ही चाकांवर सिंगल डिस्कद्वारे नियंत्रित केली जाते व मागच्या बाजूस बेस ट्रिममध्ये ड्रम ब्रेक असतो. ड्युअल डिस्क मॉडेलमध्ये ड्युअल चॅनल एबीएस असतो.

तर सिंगल डिस्कमध्ये सिंगल चॅनेल एबीएस असतो. याशिवाय कॉम्पॅक्ट डिजिटल डिस्प्ले तसेच यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि अनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इत्यादी फीचर्स देखील असणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe