अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून श्री. मनोज पाटील (I.P.S.) यांनी दि. 01/10/2020 रोजी कार्यभार स्वीकारला आहे.
पोलीस अधीक्षक यांना अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांनी काल दि. 08/10/2020 रोजी कोरोना चाचणी केली असता ती POSITIVE आलेली आहे.
मा.पोलीस अधीक्षक यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी, सर्वसामान्य नागरिक, सामाजिक व राजकीय पदाधिकारी तसेच मित्रमंडळी यांनी प्रत्यक्ष येऊन मा.साहेबांचे स्वागत करून वार्तालाप केला आहे.
मा.पोलीस अधीक्षक साहेब यांची कोरोना चाचणी POSITIVE आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करण्यात येते की, त्यांनी स्वतःबाबत योग्य ती वैद्यकीय खबरदारी घ्यावी, असे आवाहन मा.पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved