ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रात कसा राहील पाऊस? कोणत्या जिल्ह्यात पडेल कमी आणि कोणत्या जिल्ह्यात पडेल जास्त पाऊस?

Ahmednagarlive24 office
Published:
havaman

सध्या महाराष्ट्रामध्ये बरेच दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला असून राज्याच्या अनेक भागांमध्ये पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या धरणांच्या पाणी साठ्यामध्ये वाढ झाल्यामुळे ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. सध्या परिस्थितीत देखील महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.या सगळ्या पावसाच्या परिस्थितीमध्ये सध्या सुरू असलेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊसमान कसा राहील किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस पडेल याबाबतचा आपण हवामान अंदाज या लेखात बघणार आहोत.

ऑगस्टमध्ये कसे राहील पाऊसमान?

सध्या ऑगस्ट महिना सुरू असून हा प्रामुख्याने पावसाचा खंडाचा महिना म्हणून ओळखला जातो. परंतु तरी देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या कालावधीत सरासरीपेक्षा जास्त, काही जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका आणि काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी अशा तीन प्रकारात महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यानुसार….

1) सरासरीपेक्षा अधिक( 106 टक्क्यांपेक्षा अधिक)

ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या शक्यतेतील जिल्हे पाहिले तर यामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नागपूर

2) सरासरी इतका( 96 ते 104%)

सरासरी इतक्या पावसाची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबार, जळगाव, जालना, बीड, नांदेड, परभणी आणि भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.

3) सरासरीपेक्षा कमी( 90 ते 95 टक्के)

सरासरीपेक्षा कमी पावसाच्या शक्यतेतील जिल्हे पाहिले तर यामध्ये धुळे, नासिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सांगली, भंडारा आणि नागपूर वगळता संपूर्ण विदर्भ तसेच पालघर, मुंबई शहर व मुंबई उपनगर तसेच रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

संपूर्ण ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील ‘ही’ वातावरणीय स्थिती पावसासाठी नाही पूरक

संपूर्ण ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये आयओडी म्हणजेच भारत महासागरीय द्वि-ध्रुविता तटस्थ राहणार असल्याने ऑगस्टमधील पावसासाठी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील पृष्ठभागीय पाण्याचे तापमान समान असणारी तापमानीय स्थिती पावसास अडथळा करणारी नसणार आहे. परंतु तरी देखील महाराष्ट्रामध्ये सध्या जास्त पावसाची गरज असताना आयोडीची ही तटस्थ स्थिती मात्र पावसासाठी पूरक नाही. त्यामुळे देखील काही ठिकाणी कमी अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

पुढील तीन दिवस राज्याच्या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता कशी राहील?

1) अति जोरदार पाऊस – मुंबई शहर तसेच मुंबई उपनगर,ठाणे,पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, गोंदिया तसेच चंद्रपूर व गडचिरोली

2) जोरदार पावसाची शक्यता – नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, नांदेड, यवतमाळ, नागपूर आणि भंडारा

3) मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता – धाराशिव, सांगली, सोलापूर, बुलढाणा, वाशीम आणि अकोला

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe