अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होती. त्यावेळी ठरल्याप्रमाणे शिवसेनेला एक वर्ष उपनगराध्यक्ष पद देण्याचे आश्वासन संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिले होते.
योगेश बागुल यांना एक वर्ष उपनगराध्यक्ष पद दिले. यांची मुदत ३१ जुलैला संपली होती. त्यानुसार त्यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा उपमुख्यधिकारी सुनील गोर्डे यांच्याकडे गुरुवारी दिला . कालावधी उलटून गेल्यावर नवीन इच्छुक उमेदवारास आपल्या खुर्चीवर बसण्यास घाई झाली असल्याने
व त्या बाबत २ महिला,३ पुरुष असे पाच नगरसेवक बाशिंग बांधून बसल्याने भाजप (कोल्हे गट) अस्वस्थ झाला होता. या पदावर बसविण्यासाठी विद्यमान उपनगराध्यक्षांवर दबाव वाढल्याचेही चित्र पाहायला मिळाले अशी चर्चा नागरिकांत आहे. यावेळी बोलतांना योगेश बागुल म्हणाले, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, स्थानिक सर्व नेते,
नगरसेवकांनी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला उपनगराध्यक्ष मिळवून दिले व त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरत दिलेल्या शब्दा प्रमाणे एक वर्ष उपनगराध्यक्ष पदावर कार्य केले. एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे नवीन नगरसेवकांना या पदावर कार्य करण्यासाठी संधी मिळावी यासाठी आज उपमुख्यधिकारी सुनील गोर्डे यांच्या कडे राजीनामा दिला आहे.
तसेच उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे म्हणाले, उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांचा राजीनामा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या सही नुसार मंजूर केला असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
बागुल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयास पुढील कार्यवाहीच्या माहितीसाठी कळविण्यात आले आहे. पंधरा दिवसात निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होईल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved