पाण्‍याचा लाभ शेतक-यांना मिळवून देण्‍यासाठी महायुती सरकार कटीबध्‍द – ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

Ahmednagarlive24
Published:

भोजापूर चारीचे पाणी येण्‍यास ३५ वर्षे लागले. परंतू शेतक-यांना पाणी देण्‍यासाठी महायुतीचे सरकार सत्‍तेवर यावे लागले. भोजापूर चारीच्‍या  कामासाठी निधीची उपलब्‍धता करुन दिल्‍यामुळेच या कामातील अडचणी दुर झाल्‍या आहेत. चिंता करु नका, उर्वरित कामातील अडथळे सुध्‍दा दुर करुन भोजापूर चारीच्‍या पाण्‍याचा लाभ शेतक-यांना मिळवून देण्‍यासाठी महायुती सरकार कटीबध्‍द राहील अशी ग्‍वाही महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

मंत्री विखे पाटील यांनी आधिका-यां समवेत भोजापूर चारीच्‍या  कामाची पाहाणी केली. चारीचे काम कुठे अडकले आहे याची माहीतीही त्‍यांनी आधिका-यांकडून जाणून घेतली. लाभधारक शेतक-यांनी उपस्थित केलेल्‍या अडचणींवर तातडीने उपाययोजना करुन, मार्ग काढण्‍याच्‍या  सुचना त्‍यांनी जलसंधारण विभागाच्‍या वरिष्‍ठ आधिका-यांना दिल्‍या.

या प्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, या भागातील शेतक-यांना वर्षानुवर्षे पाण्‍याच्‍या प्रतिक्षा करावी लागली, निळवंडे प्रमाणेच भोजापूर चारीला पाणी का आले नाही, याचाही आता विचार करावा लागेल. वर्षानुवर्षे सर्व सत्‍तास्‍थाने होती परंतू भोजापुर लाभक्षेत्रातील शेतक-यांवर अन्‍यायच झाला.

राज्‍यात महायुतीचे सरकार आल्‍यानंतर जसा निळवंडे कालव्‍यांचा प्रश्‍न निकाली निघाला त्‍याच पध्‍दतीने भोजापूर चारीच्‍या कामालाही जलसंधारण विभागाच्‍या माध्‍यमातून निधीची उपलब्‍धता करुन दिली. अतिशय कमी कालावधीत चारीचे काम पुर्णत्‍वास गेले. काही भागांमध्‍ये  चारीचे काम हे अडकले आहे. या कामाबाबत आधिका-यांनी गांभिर्याने लक्ष देवून येत्‍या  आठवड्यात   काम मार्गी लावावे. या पावसाळ्यात चारीतून पाणी उपलब्‍ध करुन देण्‍याची जबाबदारी आता आधिका-यांची आहे. याबाबत आपणही स्‍वत:  लक्ष देवून या कामाचा आढावा घेणार असल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले.

निळवंडे धरणाच्‍या डाव्‍या आणि उजव्‍या कालव्‍यातून पाणी सोडण्‍याच्‍या सुचना आपण जलसंधारण विभागाच्‍या आधिका-यांना दिल्‍या  आहेत. ओव्‍हर फ्लोच्‍या पाण्‍याच्‍या लाभ हा शेतक-यांना व्‍हावा हीच यामागील भूमीका आहे. निळवंडे कालव्‍यांची कामे झाल्‍याने आता पाण्‍याची उपलब्‍धता होवू शकते. यापुर्वीही आवर्तनाची चाचणी यशस्‍वी  झाल्‍यानंतर लाभक्षेत्रातील शेवटच्‍या गावापर्यंत पाणी देण्‍याचा प्रयत्‍न  महायुती सरकारमुळेच होवू शकला याकडे त्‍यांनी लक्ष वेधले.

राज्‍य सरकारने शेतक-यांसाठी वीजबिल माफीचा महत्‍वपूर्ण निर्णय घेतला असून, तालुक्‍यातील दूध उत्‍पादक शेतक-यांना पाच रुपये अनुदानापोटी २० कोटी रुपये प्राप्‍त झाले आहेत. एकरुपयात पीकविमा योजनेतून १२८ कोटी रुपये मंजुर झाले आहेत. मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद तालुक्‍यातील भगिनींनी दिला असल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe