तिच्या तक्रारीला पोलीस, तहसीलदार न्याय देईना… शेवटी घेतला हा निर्णय

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अनेकदा स्वतःवर अन्याय झाला कि आपण प्रथम न्याय मिळवण्यासाठी पोलीस स्टेशनची पायरी चढतो.

मात्र हे करूनही जर न्याय मिळणार नसले तर शेवटी एकच पर्याय राहतो तो म्हणजे उपोषण… स्वत्तःचीच जमीन मिळवण्यासाठी संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथील वयोवृद्ध महिलेवर आमरण उपोषण करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

ही महिला आजपासून (शुक्रवार ता.9) घारगाव तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसली आहे. घारगाव येथील कमल भिका शिंदे या वयोवृद्धेची बोरबन येथे गट क्रमांक 240 मध्ये 0.77 गुंठे वडिललोपार्जित शेतजमीन आहे.

या मिळकतीमध्ये महिलेच्या वडीलांचा मृत्यू झाल्यापासून आजपर्यंत ताबा आहे. मात्र, दरम्यानच्या काळात महिलेच्या मोठ्या भावाचे निधन झाल्यामुळे शेजारील गावी राहण्यासाठी महिला आली होती.

दरम्यान पीडित वृद्धेचे राहते घर काही अज्ञातांनी जाळून तिच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण करुन जमिनीवर ताबा घेतला आहे. याबाबत अनेकदा घारगाव पोलिसांत तक्रारीही केलेल्या आहे.

परंतु अद्यापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. तसेच तहसीलदारांकडेही तक्रार दाखल केली होती. परंतु, प्रशासनाकडून कोणताही न्याय्य तोडगा निघाला नसल्याने

वयोवृद्ध महिला अखेर आजपासून घारगाव तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसली आहे. या महिलेबरोबर नाना गणा बर्डे हे वृद्धही उपोषणास बसलेले आहेत.

जोपर्यंत आम्हांला आमची जमीन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment