महायुतीच्या पारनेर येथील बैठकीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी जो उमेदवार वरीष्ठ पातळीवरून ठरेल त्याच काम सर्वजण एकदिलाने करू, अशी भाषणे केली. पण विखे पाटील यांनी या बैठकीचा अचानकच तातडीने सुनील थोरात यांच्या कार्यालयात आढावा घेतल्याने त्यांच्या मनात कोण उमेदवार असेल यावर पुढची राजकीय गणिते अवलंबून असतील तसेच विखे पाटील लोकसभेच्या पराभवाचा धडा घेऊन विधानसभेला कोणाला हळद लावणार याचीही चर्चा तालुक्यात रंगणार आहे.
राज्याचे महसूलमंत्री व पालकमंत्री नामदार राधाकष्ण विखे पाटील यांनी कालच पारनेर येथे झालेल्या महायुती बैठकीचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष सुनील थोरात यांच्या सुपा येथील कार्यालयात अचानकच तातडीची बैठक घेऊन आढावा घेतला.
विखे पाटील यांनी बैठकीत झालेल्या सर्व बाबींचा आढावा घेताना महायुतीमधील कोणकोणते पदाधिकारी उपस्थित होते आणि अनुपस्थित होते, याबाबत माहिती घेतली. यावेळी थोरात यांच्याशी सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली असून, नेमक विखे पाटील आणि थोरात यांच्यात काय चर्चा झाली, याबाबत थोरात यांनी बोलण्याचे टाळले.
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुक्यात सुरु असलेल्या सर्व शासकीय योजनांबाबत माहिती घेऊन प्रत्येक योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी काम करण्याचे आदेश दिलेले असून, एकही लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, यासाठी महायुतीमधील सर्वच घटकांनी प्रयत्न करावेत आशा सचना दिल्या आहेत. तसेच सर्वच शासकिय योजना सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करा अशाही सूचना केल्या.
विखे पाटलांच्या सुपा येथील सुनील थोरात यांच्या कार्यालयातील आढावा बैठकीने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून, थोरात यांच्या कार्यालयात दोंघांच्यात झालेल्या बंद दाराआड चर्चेत नेमकी आणखीन काय चर्चा झाली. याचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नसुन विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.