ग्रंथानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला श्रीगणेशाचा जन्म झाला होता. ही तिथी गणेश चतुर्थी स्वरूपात साजरी केली जाते. ग्रंथानुसार श्रीगणेशाचा जन्म माध्यान्ह काळात झाला होता.
यामुळे याच काळात श्रीगणेशाची स्थापना आणि पूजा करावी. गणेश चतुर्थीला श्रीगणेशाची स्थापना आणि पूजा केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात. सुख-समृद्धी आणि यश प्राप्त होते. यादिवशी करण्यात आलेल्या दान, व्रत आणि शुभकार्याचे अनेक पटीने फळ प्राप्त होते आणि भगवान गणेशाची कृपा राहते.
गणेश स्थापनेचे शुभ मुहूर्त
सकाळी : 09:27 ते 11:01 पर्यंत
दुपारी : 02:15 ते 03:30 पर्यंत
संध्याकाळी : 04:00 ते रात्री 08:05 पर्यंत
अशी असावी गणेशाची मूर्ती –
घर, ऑफिस किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी गणेश स्थापना करण्यासाठी मातीची मूर्ती असावी. श्रीगणेशाच्या मूर्तीची सोंड डाव्या बाजूला वळलेली असावी. घर किंवा ऑफिसमध्ये स्थायी स्वरूपात गणेश स्थापना करावयाची असल्यास सोने, चांदी, स्फटिक किंवा इत्तर पवित्र धातू किंवा रत्नापासून बनवलेली गणेश मूर्ती ठेवू शकता.
गणेश मूर्ती पूर्ण असावी. यामध्ये श्रीगणेशाच्या हातामध्ये अंकुश, पाश, लाडू आणि हात वरमुद्रा (आशीर्वाद देताना) असावे. खांद्यावर जानवे आणि वाहन स्वरूपात उंदीर असावा.
सकाळी लवकर उठून स्नान व नित्यकर्म झाल्यानंतर आपल्या सामर्थ्यानुसार सोने, चांदी, तांब, पितळ किंवा मातीपासून तयार केलेल्या श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी. (शास्त्रामध्ये मातीपासून तयार केलेल्या मूर्तीची स्थापना श्रेष्ठ मानण्यात आली आहे. पूजन स्थानावर पूर्व दिशेला मुख करून कुशच्या आसनावर बसावे.