महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- एकनाथ खडसे सक्षम विरोधी पक्षनेते होते. भाजप-सेनेच्या सरकारमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. महाविकास आघाडीत त्यांना घेण्याचा प्रयत्न चालू आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सांगितले.

आरोग्य अभियानाच्या बैठकीसाठी ते येथे आले होते. लोकशाहीचा चौथा खांब पत्रकारिता आहे. मात्र, जनभावना निर्माण करून लोकशाहीला घातक काम या क्षेत्रात होत असल्याचे दिसत आहे.

भ्रष्ट मार्गाने आपली लोकप्रियता दाखवण्याचा टीआरपी घोटाळाही उघड झाला. आर्थिक स्त्रोत वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. मुंबई पोलिसांनी त्यांची कार्यक्षमता सिद्ध केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल, असेही ते म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment