भारतीय कार बाजारपेठेमध्ये सध्या अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून वेगवेगळे आकर्षक आणि आधुनिक वैशिष्ट्य असलेल्या कार लॉन्च करण्यात येत आहेत.यामध्ये भारतातील महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स या कंपन्यांच्या कारचा समावेश आहेस. परंतु ह्युंदाई सारख्या कंपनी देखील यामध्ये आपल्याला आघाडीवर दिसून येत आहे.
या कंपनीच्या अनेक कार सध्या बाजारात असून ग्राहकांच्या देखील त्या पसंतीस उतरलेले आहेत. या कंपनीच्या माध्यमातून अनेक आधुनिक फीचर्स असलेल्या कार मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या आहेत व अशाच पद्धतीने लवकरच एक वैशिष्ट्यपूर्ण आणि आधुनिक फीचर्स असलेली कार ह्युंदाई कंपनी लॉन्च करणार असून या एसयूव्ही कारची बुकिंग देखील सुरू करण्यात आलेले आहे.
ग्राहकांना 25 हजार रुपयांची टोकन रक्कम भरून ही नवीन कार बुक करता येणार आहे. विशेष म्हणजे ही कार सहा आणि सात सीटर अशा दोन्ही पर्यायांमध्ये बाजारात दाखल होणार असून या कारमध्ये तब्बल नऊ कलर ऑप्शन आणि पॅनोरेमिक सनरूफ देण्यात आलेले आहे.
ह्युंदाईची नवीन अल्काझार लॉन्च होणार 9 सप्टेंबरला
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ह्युंदाई च्या माध्यमातून 7 सीटर असलेली अल्काझार या एसयूव्ही कारची बुकिंग सुरू करण्यात आलेले असून ती ग्राहकांना 25000 रुपयांचे टोकन रक्कम भरून बुक करता येणार आहे. विशेष म्हणजे ही कार सहा आणि सात अशा दोन सीट पर्यायांमध्ये बाजारात दाखल होणार असून या नवीन मॉडेलमध्ये नऊ कलर ऑप्शन देण्यात आलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही नवीन अल्काझार 9 सप्टेंबरला लॉंच करण्यात येणार आहे.
या कारचे वैशिष्ट्ये पाहिले तर या कारच्या पुढच्या आणि मागच्या लुकमध्ये थोडे बदल करण्यात आलेले असून ही कार क्रेटा कारवर आधारित आहे व क्रेटापेक्षा थोडा वेगळा लुक देण्याचा प्रयत्न कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या नवीन 7 सीटर अल्काझार कारला बंपर तसेच हूड, क्विड प्लेट आणि ग्रील लावण्यात आलेले आहेत व ते त्यामुळे आता जास्त प्रमाणात स्पोर्टी दिसते.
काय आहे या कारमध्ये वैशिष्ट्ये ?
कंपनीने या नवीन मॉडेलमध्ये एच आकाराचा डीआरएल आणि कॉड बीम एलईडी स्टॅंडर्ड देखील तिला असून तो क्रेटासारखाच आहे. तसेच मागच्या बाजूला नवीन बंपर आणि एलईडी लाईट्स लावण्यात आलेले आहेत व 18 इंच अलॉय व्हील देण्यात आलेले आहेत. तसेच कार मध्ये इंटेरियर देखील अपडेट करण्यात आले असून या नवीन कारमध्ये मोठा डिस्प्ले असणार आहे व तो क्लस्टरशी कनेक्ट असणार आहे. या वैशिष्ट्यांसोबतच लेव्हल दोन एडीएस आणि 360 डिग्री कॅमेरा देखील या कारमध्ये असणार असून सुरक्षिततेकरता अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि सहा एअर बॅग देण्यात आलेले आहेत.
कसे आहे या कारचे इंजिन?
ह्युंदाईच्या या नवीन अल्काझारमध्ये 1.5 लेटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते सहा स्पीड मॅन्युअल किंवा डीसीपी ट्रान्समिशनसह उपलब्ध होणार असल्याची शक्यता आहे. इतकेच नाहीतर या कारमध्ये 1.5 लिटर डिझेलचा पर्याय देखील मिळणार आहे. एवढेच नाही तर मॅन्युअल ट्रान्समिशन व टॉक कन्वर्टर देखील असू शकते. हे नवीन मॉडेल 2.0 लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह लॉन्च होण्याची शक्यता आहे.
किती असणार नवीन कारची किंमत ?
ह्युंदाईच्या या नवीन कारच्या किमतीबद्दल पाहिले तर याबाबत कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेले नाही. परंतु एक अंदाज लावला तर या कारची किंमत 16 लाख 77 हजार पासून ते 21 लाख 28 हजार रुपये दरम्यान असू शकते.