Expensive Railway Route:- वाहतूक आणि दळवणाच्या दृष्टिकोनातून जर आपण भारतीय रेल्वे विभागाचे काम पाहिले तर ते संपूर्ण जगामध्ये अव्वल दर्जाचे आहे. भारताच्या उत्तर ते दक्षिणेपासून व पूर्व ते पश्चिम पासून सर्व भागामध्ये रेल्वेचे नेटवर्क विकसित करण्यात आलेले असून अगदी डोंगराळ भागांमध्ये देखील भारतीय रेल्वेची सेवा आपल्याला दिसून येते.
ज्याप्रमाणे भारतातील सगळ्या गोष्टींमध्ये वेगळेपण आहे.अगदी तसेच वेगळेपण आपल्याला भारतीय रेल्वेच्या अनेक बाबतीत दिसून येते. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून सातत्याने अनेक महत्वाचे प्रकल्प सुरू असून वंदे भारत सारख्या ट्रेन तसेच मुंबई आणि इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरू झालेल्या मेट्रो प्रकल्पांची कामे देखील देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून व प्रवाशांसाठी महत्त्वाचे आहे.

देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आरामात आणि सहजपणे पोहोचवण्याची व्यवस्था भारतीय रेल्वेच्या माध्यमातून केली जाते. भारतीय रेल्वे तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते व अशाच एक वेगळेपण पाहिले तर भारतामध्ये महाराष्ट्रातील असा एक रेल्वे मार्गावरील प्रवास आहे की तो फक्त तीन किलोमीटरचा आहे. परंतु या तीन किलोमीटरसाठी तब्बल तुम्हाला 1255 रुपये तिकिटासाठी मोजावे लागते.
महाराष्ट्रातील नागपूर ते अजनी दरम्यानचा प्रवास आहे सर्वात महागडा रेल्वे प्रवास
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय रेल्वेचे जर अनेक बाबतीतले वेगळेपण पाहिले तर आपल्याला ते अनेक बाबतीमध्ये दिसून येते. अगदी याच प्रकारे जर आपण भारतातील सर्वात महागडा प्रवास बघितला तर तो महाराष्ट्रातील नागपूर ते अजनी यादरम्यानचा रेल्वे प्रवास आहे.
हे अंतर तीन किलोमीटरचे आहे व या तीन किलोमीटरच्या अंतरासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांसाठी विविध श्रेणीमध्ये तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. जर आपण या तीन किलोमीटरच्या प्रवासासाठी श्रेणीनुसार तिकीट दर पाहिले तर ते जनरलसाठी साठ रुपये,
स्लीपर साठी 145 ते 175 रुपये, एसी तीन टीयरसाठी 555, एसी दोन टियर साठी 760 रुपये तर फर्स्ट क्लासचे तिकीट घ्यायचे झाले तर 1255 रुपये मोजावे लागतात. विशेष म्हणजे तुम्हाला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी फक्त तीन मिनिटांचा कालावधी लागतो.
नागपूर ते अजनी प्रवास आहे महत्त्वाचा
नागपूर ते अजनी दरम्यानचा प्रवास जरी कमी अंतराचा असला तरी या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा रेल्वेच्या माध्यमातून पुरवल्या जातात. या परिसरातील स्थानिक प्रवाशांसाठी हा रेल्वे प्रवास खूप महत्त्वाचा असून या प्रवासाचा फायदा प्रवासी मोठ्या प्रमाणामध्ये घेतात. तसे पाहायला गेले तर हा कमी वेळेचा प्रवास असल्यामुळे जनरल बोगीतूनच प्रवास करण्याला प्रवाशांच्या माध्यमातून पसंती दिली जाते. हे तिकिटाचे दर पाहिले तर नक्कीच आश्चर्यचकित करणारे आहेत.