अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- कोरोना विषाणूने गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून जगभरासह भारतातही थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत.
आतापर्यंत या विषाणूंच्या प्रसाराबाबत नवनवीन गोष्टी संशोधनातून समोर आल्या आहेत. दरम्यान जपानच्या क्योटो प्रीफेक्चुरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
सार्स सीओव्ही – 2 अर्थात कोरोना विषाणू त्वचेवर तब्बल 9 तास जिवंत राहू शकतो, असा निष्कर्ष नव्या पाहणी अभ्यासात काढण्यात आला आहे.
इतर प्रकारच्या फ्लू विषाणूच्या तुलनेत कोरोनाचा विषाणू कितीतरी जास्त वेळ त्वचेवर टिकू शकतो, हे यामुळे स्पष्ट झाले आहे.
इन्फ्लुएन्जा ए विषाणू असो वा सार्स सीओव्ही – 2 विषाणू असो, हे दोन्ही विषाणू हँड सॅनिटायझच्या वापराने लगेच मरतात. क्वेटो प्रिफेक्चरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासामुळे हाथ धुणे
व हँड सॅनिटायझरचा वापर नेहमी करणे का आवश्यक आहे ही बाब अधोरेखित झाली आहे. theaustralian.com.au ने दिलेल्या वृत्तानुसार या रिसर्चमधून समोर आलं आहे की,
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हात धुणे आणि चेहऱ्याला हात न लावणे यापेक्षाही फायदेशीर उपाय आहे सोशल डिस्टंसिंग आणि मास्क घालणे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved