दोन तरुण शेतकऱ्यांनी दोन एकर मध्ये घेतले 36 टन सेंद्रिय काशीफळाचे उत्पादन! मिळाले 3 लाख 80 हजाराचे भरघोस उत्पन्न

Published on -

परंपरागत शेती पद्धती आणि परंपरागत पिके आता काळाच्या मागे पडले असून ती जागा आता तंत्रज्ञानाने आणि आधुनिक पिक पद्धतीने घेतली आहे. शेती क्षेत्रामध्ये जर सध्या आपण बघितले तर प्रामुख्याने तरुण शेतकऱ्यांनी खूप मोठी मजल मारली असून जास्तीत जास्त प्रमाणात आधुनिक अशा तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग पिके आणि इतर भाजीपाला पिकांच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेत आहेतच व त्या माध्यमातून स्वतःची आर्थिक उन्नती देखील साधत आहेत.

याच मुद्द्याला धरून जर आपण बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात असलेल्या अंत्रज या गावचे नितीन आणि पंकज काळबांधे या दोघा भावांची जर यशोगाथा बघितली तर ती इतर तरुण शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी आहे. या दोघा भावांनी शेतीमध्ये विविध प्रयोग राबवत या प्रयोगाचाच भाग म्हणून चक्क सेंद्रिय कोहळा म्हणजेच काशीफळाची लागवड केली व दोन एकरमध्ये 36 टन उत्पादन मिळवले.

कोहळा अर्थात काशीफळ उत्पादनातून मिळवले लाखात उत्पन्न
जेव्हा त्यांनी काशीफळ लागवड करण्याचा निर्णय घेतला तेव्हा पूर्वतयारी म्हणून मे महिन्यामध्ये जमिनीचे नांगरटी केली व रोटावेटर मारून जमीन भुसभुशीत करून घेतली. त्यानंतर आठ फुटांच्या अंतरावर ट्रॅक्टरच्या साह्याने अडीच फुट रुंद आणि एक फुट उंच बेड तयार केले.

ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड तयार करत असताना त्यामध्ये बायोडायनामीक पद्धतीने शेणखत व पालापाचोळ्या पासून तयार केलेल्या कंपोस्ट खताचा वापर केला व या करता एकरी चार ट्रॉली कंपोस्ट खत वापरले. उपयोग हा उत्पादन वाढीमध्ये झाला. सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यामुळे त्यांनी दोनच एकरामध्ये 36 टन काशीफळाचे उत्पादन घेतले व एका फळाचे वजन तब्बल 12 ते 25 किलोच्या दरम्यान होते.

ह्या एका फळाला सुरुवातीला पंधरा रुपये शेवटी दहा रुपये पर्यंत बाजारभाव मिळाला. त्यांनी या काशीफळाची विक्री खामगाव, शेगाव तसेच अकोट व अकोला बाजारपेठेत केली. त्यांना एकूण 70 हजाराचा खर्च आला व या 70 हजार खर्च करून त्यांनी तीन ते तीन लाख वीस हजार रुपयांपर्यंत नफा मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News