हृदयद्रावक घटना …व्यसनाधीन बाप प्रयत्न करूनही सुधारत नसल्याने 20 वर्षीय मुलाने केले असे काही…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना शुक्रवारी  घडली. व्यसनाधीन बाप अनेक प्रयत्न करूनही सुधारत नसल्याने 20 वर्षीय मुलाने गळफास घेवून आत्महत्या केली.  

लोणी पोलीस ठाण्याजवळच असलेल्या लोमेश्वरनगर वसाहतीमध्ये राहणार्‍या शुभम अनिल चव्हाण (वय 20) हा तरुण त्याच्या राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला.

गरिबी, अठरा विश्व दारिद्र्य यातून सुखाचे दिवस येण्यासाठी शुभम आणि त्याची आई मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत होते. शुभमच्या वडिलांना दारूचे व्यसन लागल्याने त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला होत होता.

बहिणीचे लग्न झाल्यानंतर वडिलांमध्ये सुधारणा होईल आणि कष्टाच्या पैशातून सुखाचे दिवस येतील यासाठी जीवाचे रान करून माय-लेक मिळेल ते काम करीत होते. पण या सर्वांवर पाणी फिरत राहिले.

वडिलांची व्यसनाधीनता कमी होण्याऐवजी वाढीत गेली. त्यातून नैराश्य येऊन शुभमने शुक्रवारी सकाळी राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास लावून जीवन यात्रा संपवली.

लोणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन प्रवरा रुग्णालयात शवविच्छेदन केले. पोलिसांनी या घटनेमागील कारणांची चौकशी केली असता वडिलांच्या व्यसनाधिनतेला कंटाळून शुभमने आत्महत्या केल्याचे समोर आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment