शेतीच्या जुन्या वादातून मारहाण, डोक्यावर केला कुऱ्हाडीने वार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- शेतीच्या जुन्या वादातून कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. ही घटना महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी वीरगाव येथे घडली. मात्र, साक्षीदारांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पोलिसांकडे उशिरा तक्रार दाखल करण्यात आली.

भागवत गबाजी कुमकर (वय ५७) यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार झाल्याने ते जखमी झाले. याप्रकरणी सोपान संपत कुमकर, पोपट ऊर्फ बाजीराव संपत कुमकर, कौसाबाई संपत कुमकर यांना आरोपी करण्यात आले आहे.

भागवत त्यांच्या शेतीत मशागतीसाठी ट्रॅक्टर घेऊन गेले होते. ते विहिरीकडे जात असताना आरोपी तेथे आले. त्यांनी भागवत यांना पुढे जाण्यास मज्जाव केला.

जमिनीचा जुना वाद काढून भागवत यांना ट्रॅक्टरच्या खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पेटवून देण्याची धमकी दिली.

संपत कुमकर याने कुऱ्हाडीच्या तुंब्याने भागवत यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर, तसेच उजव्या हाताच्या मनगटावर मारहाण केली. डोक्यावरही कुऱ्हाडीने मारहाण करुन गंभीर जखमी केले.

भागवत यांचा कोपर फ्रॅक्चर झाला असून डोक्याला सात टाके पडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास अकोल्याचे पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखालील हवालदार बाबासाहेब भोसले करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment