अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :-कोरोनामुळे देवस्थाने बंद आहेत. भाविकांसाठी पाच महिन्यांपूर्वी देवस्थान प्रशासनाने मुख्य दरवाजाजवळ स्क्रीन लावून दर्शन चालू केले.
या निर्णयाचे अनेक भाविकांनी कौतुक केले. राज्यातील, तसेच बाहेरील अनेक भाविक दर्शन घेत आहेत. दोन ते तीन अतिउत्साही विश्वस्त आपल्या मर्जीतील भाविकांना घेऊन दर्शनासाठी आत जात आहेत.

मागील महिन्यात एका विश्वस्ताने नगर शहरातील युवा नेत्यासाठी पायघड्या टाकल्या होत्या. गावातील एका तरुण नेता सायंकाळी भाविकांना घेऊन मंदिरात गेला होता, अशी ग्रामस्थांत चर्चा आहे.
विश्वस्त, अधिकारी व कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कुणालाही प्रवेश द्यायचा नाही, असे विश्वस्तांच्या बैठकीत ठरले असतानाही त्या नियमांचे पालन होत नाही.
शिंगणापूर देवस्थानच्या ग्रामीण रुग्णालयाच्या, तसेच भक्तनिवासमध्ये कर्मचाऱ्यांनी कोरोना रुग्णांसाठी मोठे काम केले असून राज्यातील सर्वात चांगले कोविड सेंटर म्हणून शिंगणापूरचा उल्लेख होत आहे.
परंतु अतिउत्साही विश्वस्तांनी नियम तोडल्याच्या प्रकरणाची सध्या चर्चा होत आहे. सर्वांना एकच नियम असावा, जो विश्वस्त आपल्या मर्जीतील भाविकांना आत घेऊन जाईल, त्याच्यावर धर्मादाय आयुक्तांनी कारवाई करावी,
अशी मागणी भाविकांतून होत आहे. नेवासे तालुक्यातील राजकीय, सामाजिक, तसेच अनेक ग्रामस्थांनी नियमांचे पालन केले असून मनात इच्छा असूनही त्यांनी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला नाही. परंतु काही विश्वस्त आपल्या मर्जीतील भाविकांसाठी नियम मोडत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved