आरे कारे म्हणणारे आता अचानक बाबा दादा म्हणायला लागले, आता कावळ्याच्या आधी पोहोचायला लागले…. थोरातांची विखे पाटील यांच्या होमपीचवर जोरदार फटकेबाजी

बाळासाहेब थोरात यांनी देखील थेट विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहता तालुक्यात असलेल्या गणेश नगर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना बाळासाहेब थोरात यांनी अनेक मुद्द्यांच्या माध्यमातून विखे पिता पुत्रांचा खरपूस समाचार घेतला.

Ajay Patil
Published:
thorat and sujay vikhe

अहमदनगर जिल्ह्याचे जर राजकारण पाहिले तर ते प्रामुख्याने काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सभोवती फिरताना आपल्याला दिसून येते. हे दोघे नेते एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असून एकमेकांना शह काटशह देण्याची एकही संधी दोघांच्या माध्यमातून सोडली जात नाही.

राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम  सुरू आहे व संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापायला लागले आहेत व त्याची झळ आता अहमदनगर पर्यंत पोहोचायला लागली की काय अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे. नुकतीच डॉ. सुजय विखे पाटील यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत व त्यांना त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील एक प्रकारे सपोर्ट केला आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात बाळासाहेब थोरात आणि विखे पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र आणि टोकाचा होईल यात शंकाच नाही. विधानसभा निवडणुकीला अजून काही दिवस बाकी असताना मात्र थोरात आणि विखे पिता पुत्र यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक हल्ले आपल्याला दिसून येत असून विखे पितापुत्रांनी आक्रमकपणे बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केल्याचे आपण बघितले

. परंतु आता बाळासाहेब थोरात यांनी देखील थेट विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहता तालुक्यात असलेल्या गणेश नगर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना बाळासाहेब थोरात यांनी अनेक मुद्द्यांच्या माध्यमातून विखे पिता पुत्रांचा खरपूस समाचार घेतला.

 कारखान्याला कर्ज मिळण्यामध्ये का आणता अडचणी?

राहता तालुक्यातील गणेश नगर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बाळासाहेब थोरात यांनी हजेरी लावली व या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी अनेक मुद्द्यांना  हात घातला. यावेळी विखे पाटील यांच्यावर नाव न घेता  टीका करताना त्यांनी म्हटले की,जर साखर कारखाना चांगला चालत असेल व त्याच्यातून सभासदांचे हित होत असेल व ते सुखी होत असतील तर जनतेच्या सुखामध्ये विघ्न आणण्याचे कारण काय? त्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचे कारण काय? की दुष्ट बुद्धी का ठेवावी? असे अनेक प्रश्न त्यांनी या उद्देशाने उपस्थित केले.

तसेच पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, इथली जी काही नेतेमंडळी आहे ते जनतेला कायम दहशती खाली ठेवण्याचे काम करतात व त्या माध्यमातून मतदान करण्यासाठी त्यांना भाग पाडले जाते.

परंतु अशी दहशत जास्त दिवस टिकत नाही व त्या माध्यमातून आता हळूहळू काय होत आहे असे उद्देशून त्यांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा लोकसभेतील पराभवावर देखील भाष्य केले. तसेच नागरिक देखील आता अशा प्रकारची दहशत यापुढे खपवून घेणार नाहीत असे देखील त्यांनी म्हटले.

 अगोदर आरे कारे म्हणणारे आता बाबा दादा म्हणायला लागले

तसेच यावेळी बोलताना त्यांनी सुजय विखे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांच्यामध्ये कशा पद्धतीचे बदल झाले आहेत यावर मिश्किलपणे टीका करताना त्यांनी म्हटले की,जे अगोदर लोकांना अरे कारे करत होते ते आता अचानक बाबा दादा करायला लागले.

इतकेच नाहीतर आता जो नागरिकांकडे पाहत देखील न होता,तो आता जनतेसमोर वाकायला लागला हा जो काही बदल घडून आला तो तुमच्या आमच्यामुळे झाला असे देखील त्यांनी बोलताना म्हटले.

 सुजय विखेंचे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर केले भाष्य

गेल्या काही दिवसापासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत व त्या प्रकारचे संकेत देखील त्यांच्याकडून मिळाले आहेत.

यावर देखील  आ. बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केले व म्हटले की, ते जर संगमनेर मधून निवडणूक लढवत असतील तर मी त्यांचे स्वागत करायला तयार आहे व एवढेच नाही तर आमचे लोक देखील त्यांचे स्वागतच करतील.

लोकशाहीने कोणालाही कोणत्याही ठिकाणाहून निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे व त्यामुळे ते संगमनेर मधून निवडणूक लढवू शकतात.

 महसूल मंत्री असताना काय केले?… विखेंच्या टिकेला दिले उत्तर

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की माझ्यावर आरोप केले जातात की महसूल मंत्री असताना काय कामे केलीत? परंतु आम्ही काहीही काम केले नाही परंतु आम्ही कोणाला विनाकारण जेलमध्ये घातले नाही. जो तुमच्या विरोधात जातो त्यावर खोट्या केसेस टाकून जेलमध्ये टाकले जाते व विरोधात गेले म्हणून गुंड रस्त्यांवर मारतात.

अशा प्रकारची कामे आम्हाला जमले नाहीत व त्यामुळे आम्ही अशा प्रकारची कामे केली नाहीत या पद्धतीची जळजळीत टीका देखील त्यांनी विखे पाटील यांच्यावर नाव न घेता केली.परंतु या पद्धतीचे तुमचे कामे आता तुम्हाला नडणार असं देखील त्यांनी म्हटले.

तसेच एमआयडीसीवर बोलताना त्यांनी म्हटले की तुम्ही इतक्या वर्षापासून आमदार आहात व तुमचा परिवार जवळपास 50 वर्षापासून राजकारणात होते परंतु इतक्या दिवसापासून एमआयडीसी का आणली नाही? एमआयडीसी आणायला इतका उशीर का? असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला व निवडणुका आल्या म्हणून आता एमआयडीसी आणल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe