अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- राज्यात कोरोनाचे संकट आद्यपही कायम आहे. तसेच या संकटमय काळात महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्यांबरोबरच शेतकऱ्यांच्या हितासाठी खंबीर उभे राहिले आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. तसेच यावेळी बोलताना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपाला चांगलाच टोला लगावला.
महायुतीच्या सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली पहाटे पासून शेतकऱ्यांना रांगा लावायला लावल्या मात्र प्रत्यक्षात दिले काही नाही. आताच्या महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे.
कोरोनाचे संकट आले तरीही आमचे सरकार शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दापासून मागे हटले नाही,’ असेही थोरात म्हणाले. संगमनेर तालुक्यातील आयोजित एका कार्यक्रमात थोरात बोलत होते.
थोरात म्हणाले, ‘केंद्र सरकारने विना चर्चेने व घाईघाईत मंजूर केलेले नवे कृषी विधेयक हे आधारभूत किंमत विनाआधार करणारे असून संघर्षातून कामगारांनी मिळवलेले अधिकार नव्या कामगार कायद्याने संपुष्टात येणार आहेत. भांडवलदारांच्या सोयीसाठी शेतकरी व कामगार विरोधी केलेले काळे कायदे केंद्र सरकारने तातडीने रद्द करावेत.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना केंद्रभूत मानून काम करत आहे. हे सरकार भक्कम असून पाच वर्षे चांगले काम करेल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved