अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-समस्येचे उत्तर हवे असले कि एकच नाव सध्या चर्चेत आहे, ते म्हणजे आमदार रोहित पवार होय.
आपल्या कर्यतत्परतेमुळे जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार हे समाजसेवेसाठी व मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असतात. असाच काहीसा अनुभव राशीनकरांना नुकताच आला.
पुरामुळे करपडी (ता.कर्जत) येथील मुख्य रस्त्यावरील ओढ्यावर असलेला पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला. त्यामुळे करपडी गावचा संपर्क तुटला.
अशा कठीण प्रसंगात गावातील एका तरुणाने आमदार रोहित पवारांना कॉल केला व पवारांचा रिप्लाय आला लगेच ‘आलो! काही तासांत आमदार भरपावसात घटनास्थळी हजर होतात आणि त्यावर उपाय योजनाही करतात.
यावेळी सुरेश शिंदे यांनी आ.रोहित पवार यांना याबाबत फोनवर माहिती दिली. आणि कामानिमित्त पुणे या ठिकाणी असलेले आ.पवार काही तासातच करपडीच्या घटनास्थळी पोहोचले.
आ. पवारांनी ग्रामस्थांना धीर देत भर पावसात पुरात वाहून गेलेल्या पुलाची पाहणी केली. ओढ्यातील पाणी ओसरल्यानंतर तात्काळ सिमेंटचे पाईप उपलब्ध करून जेसीबीच्या साहाय्याने त्यावर मुरुमीकरणाचा भरावा करून घेऊ’ असा तोडगा काढला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved