श्रीरामपूर : शहरातील सूतगिरणी परिसरात राहणारे रामदास भीमराज कडनोर (वय ३४) यांचा मृतदेह कालव्यात आढळून आला होता. पोलीस तपासात त्यांचा खून झाल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, रामदास कडनोर यांचा मृतदेह दि. १६ ऑगस्ट रोजी वॉर्ड क्र. दोनमध्ये कालव्यात आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला होता.

शवविच्छेदन अहवालात कडनोर यांच्या डोक्यात टणक हत्यार मारल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानुसार पोलीस नाईक अमोल जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गु.र.नं. ३७/२०१९ नुसार भा. दं. वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अर्थसंकल्पातून पशुपालनाला बळ; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी डेअरी क्षेत्र ठरणार कणा
- सोने-चांदीच्या बाजारात मोठी उलथापालथ; ऐतिहासिक घसरणीनंतर गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता
- सोयाबीन दरवाढीने लातूर बाजारात चैतन्य; शेतकरी, व्यापारी आणि अडत्यांमध्ये वाढली हालचाल
- मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे हाल; ठाणे-कल्याण दरम्यान प्रवाशांची मोठी गैरसोय
- पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ४ नव्या लोकल फेऱ्या सुरू, वेळापत्रक काय असेल?













