नगरकरांनो सावधान! जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बंगलाच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ अहमदनगर जिल्ह्यातून जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची संभावना निर्माण झाली आहे.

हवामान खात्याकडून जिल्ह्यात 15 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या 179 टक्के पाऊस झाला असून

अजूनही जोरदार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आवाहन करण्यात आले आहे की,

नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जाणार्‍या सूचनांचे पालन करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये.

तसेच पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेवू नये. आपत्कालिन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा.

हेल्पलाईन नंबर – अहमदनगर येथे टोल फ्री क्रमांक 1077, 0241-2323844/2356940 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment