श्रीरामपूर काँग्रेसमध्ये फुट ही तर निव्वळ अफवा… हे तर विरोधकांचे षडयंत्र! आ.लहू कानडेंची टीका

श्रीरामपूर काँग्रेसच्या माध्यमातून या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार लहू कानडे यांच्या मार्गदर्शनामध्ये बुथ समिती सदस्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.या प्रशिक्षणा दरम्यान आमदार लहू कानडे यांनी बोलताना म्हटले की, श्रीरामपूर काँग्रेसमध्ये फूट पडली अशी निव्वळ अफवा पसरवली जात असून ते विरोधकांचे षडयंत्र असून काँग्रेस पक्षाविरुद्ध खोटा प्रचार केला जात असल्याची टीका त्यांनी केली.

Updated on -

Ahilyanagar News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पक्षाकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत असून अगदी खालच्या फळीतील कार्यकर्ते तसेच बुध प्रमुखांच्या व  पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात असून या माध्यमातून या निवडणुकीसाठीचा संपूर्ण प्लॅनिंग तयार केल्या जात आहेत.

अजूनही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण जागावाटप करण्यात न आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत पाहता या विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण तापायला लागले असून जणू काही राजकीय फिवर चढल्याचे चित्र दिसून येत आहे

. त्यातल्या त्यात काही पक्षांना अंतर्गतच विरोधाला सामोरे जावे लागत असून इच्छुकांची मनधरणी करावी लागत आहे. याच पद्धतीने श्रीरामपूर काँग्रेसच्या माध्यमातून या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार लहू कानडे यांच्या मार्गदर्शनामध्ये बुथ समिती सदस्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षणा दरम्यान आमदार लहू कानडे यांनी बोलताना म्हटले की, श्रीरामपूर काँग्रेसमध्ये फूट पडली अशी निव्वळ अफवा पसरवली जात असून ते विरोधकांचे षडयंत्र असून काँग्रेस पक्षाविरुद्ध खोटा प्रचार केला जात असल्याची टीका त्यांनी केली.

तसेच निवडणुकीसाठी उमेदवारी मागणे याच्यात काही वाईट नाही. परंतु इच्छुकाने आपल्याच पक्षाच्या नेत्याविरुद्ध खोटे आरोप करणे हे पक्षाला दुबळे करण्यासारखे ठरते असे देखील त्यांनी म्हटले.

श्रीरामपूर काँग्रेसमध्ये फुट ही निव्वळ अफवाआमदार लहू कानडे

श्रीरामपूर काँग्रेसमध्ये फूट पडली अशी अफवा पसरवली जात – आहे. ते विरोधकांचे षड्यंत्र असून, काँग्रेस पक्षाविरुद्ध खोटा प्रचार केला जात आहे, अशी टीका आमदार लहू कानडे यांनी केली.

निवडणुकीसाठी उमेदवारी मागणीत गैर काहीही नाही. मात्र, इच्छुकाने आपल्याच पक्षाच्या नेत्याविरुद्ध खोटे आरोप करणे हे पक्षाला दुबळे करणे ठरते, असे कानडे यांनी सांगितले. आमदार लहू कानडे यांच्या यशोधन कार्यालयात बूथ समिती सदस्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

तालुकाध्यक्ष अरुण नाईक, माजी उपनगराध्यक्ष अंजूम शेख, रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, मुख्तार शहा, विजय शेळके, कलीम कुरेशी, प्रकाश ढोकणे, मोहम्मद शेख, सलीम शेख, भाऊसाहेब मुळे, मल्लू शिंदे, अॅड. समीन बागवान, सतीश बोर्डे, सरपंच सागर मुठे, सुरेश पवार उपस्थित होते. कानडे म्हणाले, आपण आरोपांचा जाणीवपूर्वक प्रतिवाद करत नाही.

जनतेला सर्व माहिती असते. योग्यवेळी बाहेरच्या व्यक्तींना सडेतोड उत्तर देण्यात येईल. सध्या आपण सर्वांनी बूथनिहाय प्रचार यंत्रणा सुदृढ करण्याकडे लक्ष द्यायचे असून, काँग्रेस पक्षाचा आमदार निवडून आणावयाचा आहे.

उमेदवारी निश्चित झाल्यानंतर सर्व काँग्रेसजन एकत्र येऊन लढतील, असा शब्द माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलेला आहे. त्यामुळे कोणताही संभ्रम निर्माण न होऊ देता प्रचार कार्यावरच लक्ष केंद्रित करावे.यावेळी मतदारसंघातील एकूण ३११ बूथ समित्यांचे प्रत्येकी दहा बूथप्रमाणे ३१ गट करून प्रत्येक गटातील सुमारे शंभर सदस्यांना प्रशिक्षित करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe