Numerology:- अंकशास्त्र हे खूप महत्त्वाचे असे शास्त्र असून यामध्ये व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला झालेला असतो त्या तारखेवरून संबंधित व्यक्तीचे भविष्य किंवा त्याचे व्यक्तिमत्व व त्याचे भविष्यकालीन जीवन कसे राहील? याबाबतची माहिती आपल्याला मिळते. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मुलांक हा काढला जातो.
मुलांकावरून अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्त्वाविषयीची माहिती मिळत असते. आपल्याला माहित आहे की, मुलांक काढताना व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला झालेला असतो त्या तारखेच्या अंकांची बेरीज केली जाते.
म्हणजे उदाहरण घ्यायचे झाले तर एखाद्या व्यक्तीचा जन्म जर कोणत्याही महिन्याच्या अकरा तारखेला झालेला असेल तर त्या व्यक्तीचा मुलांक हा 1+1=2 अशाप्रकारे काढला जातो.म्हणजेच 11 तारखेला जन्म झालेल्या व्यक्तीचा मूलांक हा दोन आहे.
अगदी याच पद्धतीने कोणत्याही महिन्याच्या एक, दहा आणि 28 व 19 या तारखांना जर जन्म झालेला असेल तर या लोकांचा मुलांक हा एक असतो. अंकशास्त्रानुसार बघितले तर एक या मुलांकाचा स्वामी सूर्य असून या लोकांचा स्वभाव इतरांपेक्षा खूप वेगळा असतो.
ज्या लोकांचा जन्म वर सांगितलेल्या म्हणजेच कोणत्याही महिन्याची दहा, एकोणावीस, 28 आणि एक तारखेला झालेला असेल असे लोक हे यांच्या उत्तम नेतृत्वाकरिता ओळखले जातात व ते दृढनिश्चयी देखील असतात. या लेखामध्ये आपण एक मुलांक असणाऱ्या व्यक्ती या कशा असतात किंवा त्यांचे व्यक्तिमत्व कसे असते? याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.
एक मुलांक असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो?
वर उल्लेख केलेल्या कोणत्याही जन्म तारखेला जन्म झालेले लोक हे प्रामाणिक असतात,परंतु थोडेसे हट्टी देखील असतात. त्यांच्यामध्ये थोडाफार अहंकार दिसून येतो व ते प्रचंड स्वाभिमानी तसेच महत्त्वाकांक्षी असतात.
एक मुलांक असलेल्या व्यक्तींचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणाच्याही हाताखाली काम करू शकत नाही किंवा कुणाच्या अधीन राहत नाहीत.
यांच्या आयुष्यामध्ये किती जरी संकटे आली तरी ते धैर्याने संकटांना तोंड देतात व त्यातून मार्ग काढतात. या जन्म तारखेला जन्मलेल्या लोकांची आर्थिक स्थिती देखील मजबूत असते. परंतु समाजामध्ये ते कधीकधी स्वार्थी पद्धतीने देखील वागतात.
प्रेम कधीच व्यक्त करत नाहीत
नातेसंबंध किंवा प्रेम संबंधाच्या बाबतीत जर मुलांक एक असणारे लोक बघितले तर ते खूप लाजाळू स्वभावाचे असतात व त्यामुळे ते त्यांच्या मनातील भावना कधीच समोरच्या व्यक्तीकडे किंवा प्रिय व्यक्तीसमोर खुलून व्यक्त करत नाहीत.
अंकशास्त्रानुसार बघितले तर जवळपास या तारखांना जन्मलेल्या लोकांचे लव मॅरेज कधीच होत नाही तर त्यांचे अरेंज मॅरेज होते. नात्याच्या बाबतीत ते कायमच गोंधळलेल्या स्थितीमध्ये असतात.
परंतु अंकशास्त्रानुसार बघितले तर एक मुलांक असणाऱ्या लोकांचे तीन, चार,पाच,आठ आणि नऊ या मूलांक असलेल्या व्यक्तींसोबत खूप पटते.चार मुलांक असणारे लोक या व्यक्तींसाठी परिपूर्ण जोडीदार किंवा परफेक्ट पार्टनर असतात.
( टीप– वरील माहिती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे. याविषयी अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचा दावा किंवा त्या माहितीचे समर्थन करत नाही.)