स्वस्तात मस्त विदेशात फिरायचे असेल तर ‘हे’ देश ठरतील उत्तम पर्याय! कमी खर्चात फिरण्याचा घेता येईल मनमुराद आनंद

देश विदेशातील पर्यटन स्थळांना भेटी देण्याचा छंद किंवा आवड ही अनेक व्यक्तींना असते. असे व्यक्ती फिरण्यासाठी कितीही खर्च आला तरी देखील मागेपुढे पाहत नाहीत. यामध्ये विविध नैसर्गिक पर्यटन स्थळांपासून तर आध्यात्मिक पर्यटन स्थळांना भेटी देण्याचा कल आपल्याला अशा पर्यटकांमध्ये दिसून येतो.

Published on -

Budget Tourist Country:- देश विदेशातील पर्यटन स्थळांना भेटी देण्याचा छंद किंवा आवड ही अनेक व्यक्तींना असते. असे व्यक्ती फिरण्यासाठी कितीही खर्च आला तरी देखील मागेपुढे पाहत नाहीत. यामध्ये विविध नैसर्गिक पर्यटन स्थळांपासून तर आध्यात्मिक पर्यटन स्थळांना भेटी देण्याचा कल आपल्याला अशा पर्यटकांमध्ये दिसून येतो.

काही पर्यटक तर देशातच नाही तर विदेशात जाऊन देखील पर्यटनाचा आनंद घेतात. विदेश किंवा दुसऱ्या देशामध्ये फिरायला जायचा प्लान बरेच जण करतात किंवा प्रत्येकाची ती इच्छा असते.

परंतु बाहेर देशामध्ये फिरण्याचा जो काही खर्च येतो तो मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. त्यामुळे विदेश पर्यटनाची इच्छा ही पूर्ण न होता मनातच ठेवावी लागते.

परंतु जगाच्या पाठीवर असेही काही देश आहेत की त्या ठिकाणी तुम्ही अगदी कमीत कमी खर्चामध्ये जाऊन फिरू शकता व पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात.अशाच काही देशांची यादी आपण या लेखात बघू. या देशांना कमीत कमी खर्चात फिरता येणे शक्य होते.
या देशांना फिरण्यासाठी येतो कमीत कमी खर्च
1- कंबोडीया- जगाच्या पाठीवरील स्वस्त देशांची यादी पाहिली तर यामध्ये कंबोडिया या देशाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. जर आपण चलनाच्या दृष्टिकोनातून भारतीय चलन व कंबोडियन चलनाचा विचार केला तर भारताच्या एक रुपयाची किंमत 50 कंबोडियन रील इतकी आहे.

या देशामध्ये जर तुम्ही फिरायला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला अनेक ऐतिहासिक व प्राचीन मंदिर पाहायला मिळतात आणि प्राचीन गुहा देखील या ठिकाणी असून या ठिकाणाचे म्युझियम पाहण्यासारखे आहेत.

2- नेपाळ- आपल्याला माहित आहे की भारताच्या शेजारचा हा देश असून या ठिकाणी भारतीयांना सहजपणे जाता येता येते. विशेष म्हणजे नेपाळला जाण्यासाठी तुम्हाला व्हिजाची देखील आवश्यकता नसते.

नेपाळला गेल्यावर तुम्ही त्या ठिकाणाचे प्राचीन मंदिर पाहू शकतात. चलनाच्या दृष्टिकोनातून बघितले तर भारताच्या एक रुपयाची किंमत 1.60 नेपाळी रुपये इतकी आहे. भारतातून दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक नेपाळला फिरायला जातात.

3- श्रीलंका- तुम्हाला स्वस्तात मस्त जर ट्रीप प्लान करायची असेल तर तुमच्यासाठी श्रीलंका हा देखील एक चांगला पर्याय आहे. आपल्याला माहित आहे की हिंद महासागराच्या उत्तर भागात समुद्र बेट श्रीलंका देश असून या ठिकाणी देखील अनेक उत्तम अशी पर्यटन स्थळे आहेत.

या ठिकाणची ट्रीप तुम्ही कमीत कमी खर्चात प्लॅन करू शकतात. चलनाच्या दृष्टिकोनातून बघितले तर भारताच्या एक रुपयाची किंमत श्रीलंकेत 3.75 श्रीलंकाई रुपये इतकी आहे.

4- इंडोनेशिया- हा खूप सुंदर असा देश असून तुम्हाला जर बीच पाहण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी इंडोनेशिया हा एक चांगला पर्याय आहे. इंडोनेशियासाठी तुम्ही बजेट ट्रॅव्हल करू शकतात.

चलन विषयक पाहिले तर या ठिकाणी भारताच्या एक रुपयाची किंमत 180 इंडोनेशियाई रुपये आहे. या ठिकाणाचा निसर्ग देखील खूप सुंदर असल्या कारणाने इंडोनेशियातील पर्यटन तुमच्या मनाला एकदम फ्रेश करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News