निवडणूक कालावधीत सोबत ठेवता येईल 50 हजारापर्यंत रोकड,यापेक्षा जास्त रक्कम असेल तर…? जास्त रक्कम सोबत असेल तर काय कराल?

आचारसहिता कालावधीमध्ये अनेक प्रकारचे निर्बंध येतात व काही नियमांचे पालन करणे देखील तितकेच गरजेचे असते. अशाप्रकारे जर नियमांचा किंवा निर्बंधांचा भंग झाला तर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे काही नियम कसोशीने पाळणे खूप गरजेचे आहे.

Published on -

Rule Of Code Of Conduct:- सध्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे व 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबर पासून संपूर्ण राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे.

त्यामुळे आचारसहिता कालावधीमध्ये अनेक प्रकारचे निर्बंध येतात व काही नियमांचे पालन करणे देखील तितकेच गरजेचे असते. अशाप्रकारे जर नियमांचा किंवा निर्बंधांचा भंग झाला तर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे काही नियम कसोशीने पाळणे खूप गरजेचे आहे.

या नियमांचा विचार केला तर यामध्ये आचारसंहिता कालावधीत व्यक्तीला जवळ किती रक्कम ठेवता येते? व त्यापेक्षा जर जास्तीची रक्कम असेल तर काय होऊ शकते? याबाबत देखील नियम आहेत. याबाबत जर नियमांचा भंग केला तर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे किती रोकड सोबत ठेवता येते यासंबंधीचे नियम माहिती असणे खूप गरजेचे आहे.

50 हजारापर्यंत रोकड सोबत ठेवा
विधानसभा निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबर पासून राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. या आचारसंहिता कालावधीमध्ये 50 हजार रुपये रक्कम जवळ ठेवता येणार आहे. त्यापेक्षा जर जास्तीचे रक्कम सापडली तर मात्र संबंधित व्यक्ती वर आचारसंहितेचा गुन्हा दाखल होणार आहे.

या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आचारसंहितेचा भंग किंवा उल्लंघन होऊ नये याकरिता अहिल्यानगर जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यासोबत स्थिर सर्वेक्षण पथक देखील असणार आहेत. या आचारसंहिता कालावधीमध्ये उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी किंवा मतदार यांना 50000 पर्यंतची रोकड सोबत बाळगता येते.

यापेक्षा जास्तीची रक्कम जर सोबत असेल तर ती जप्त केली जाऊ शकते व संबंधित व्यक्तीवर गुन्हा देखील दाखल होणार आहे. यामध्ये नागरिकाकडे 50000 पेक्षा अधिक आणि दहा लाखांपर्यंत रक्कम सापडल्यास आणि त्या रकमेचा योग्य पुरावा असला तरीदेखील संबंधित रक्कम खर्च सनियंत्रण समितीकडे पाठवले जाते.

पैसे सोबत असतील तर काय कराल?
आचारसंहितेमुळे या निवडणुकीच्या कालावधीत रोकड सोबत बाळगण्यावर मर्यादा आली असून अतिशय इमर्जन्सी किंवा महत्त्वाचे काम असेल तर तुम्ही पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम घेऊन बाहेर जाऊ शकतात.

परंतु त्याकरिता तुमच्याजवळ बँकेचे स्टेटमेंट तसेच तुम्हाला त्या रकमेची गरज असलेला पुरावा इत्यादी कागदपत्रे सोबत ठेवणे गरजेचे आहे.

पतसंस्थांसाठी आहे दहा लाख रुपयांची मर्यादा
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सहकारी पतसंस्थेतून एकाच दिवशी रोकड दहा लाख रुपये काढले तर त्याची माहिती सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला कळवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

तसेच तालुकास्तरावर ज्या संस्थेमध्ये दहा लाख रुपये भरणा केला असेल किंवा काढले असतील तर त्याची माहिती तालुका पातळीवरील कार्यालयाला दयायचे आहे. त्यानंतर ही माहिती सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपनिबंधक कार्यालयाला पाठवण्यात येते व ती संकलित करून आयकर विभागाला पाठवले जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe