‘त्या’ तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- पुणे जिल्ह्यातील म्हसे बुद्रूक येथून पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द येथे शेळ्या, मेंढया चारण्यासाठी येणाऱ्या तरूणास जातीवाचक शिविगाळ करून, मानसिक त्रास देत आमच्या गावात मेंढ्या चारायला यायचे नाही,

अशा वारंवार देण्यात येणाऱ्या धमक्यांना कंटाळून परसराम लालचंद्र काळे या २५ वर्षीय तरूणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी म्हसे खुर्द येथील सुभाष मारूती बढे व शिवाजी दिनकर मदगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परसरामचा मामा विनोद निवृत्ती भोसले (वय ३२, म्हसे बुद्रूक) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

२६ जानेवारीपासून परसराम हा म्हसे खुर्द शिवारात मेंढ्या चारण्यासाठी जात होता. बढे व मदगे हे दोघे त्याला म्हसे खुर्द शिवारात येण्यास मनाई करत.

जातीवाचक शिविगाळ करून आमच्या गावात मेंढ्या चारण्यासाठी यायचे नाही, असे धमकावून मानसिक त्रास देत. तो सहन न झाल्याने ११ ऑक्टोबरला दुपारी परसरामने म्हसे खुर्द शिवारातील शिंदे मळ्यात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

बढे व मदगे यांनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे भोसले यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment